आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा आणि संस्कृतीला पर्याय नाहीच : ‘आप्पा’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेतील आप्पा प्रेक्षकांच्या आवडीचे झालेले आहेत. आप्पा म्हणजेच अभिनेते सुनील गोडबोले यांच्याशी त्यांच्या भूमिकेविषयी आणि मालिकेविषयी मारलेल्या या गप्पा.. 

ही भूमिका करताना कुठल्या आव्हानांना तोंड द्यावे लागते?
या भूमिकेविषयी मला विचारण्यात आले, तेव्हा मला आनंद झाला होता. या आनंदाचे, कारण म्हणजे या भूमिकेचे वेगळेपण! सर्वच भूमिका आव्हानात्मक असतात. पण, या भूमिकेसाठी शुद्ध आणि स्पष्ट मराठीचा वापर करावा लागणार होता. या पात्राची एक स्वतःची अशी खासियत होती. त्यामुळे ही भूमिका आव्हानात्मक वाटली आणि मी ती स्वीकारायचे ठरवले. 

या भूमिकेसाठी काय तयारी करावी लागली?
या भूमिकेसाठी फार मेहनत घेण्याची गरज पडली नाही. याआधी ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांमधून काम केलेले असल्याने, शब्दांचे उच्चार, लहेजा वगैरे गोष्टींचा अभ्यास आधीच झालेला होता. 

इंग्रजीचा प्रभाव मराठीवर पडताेय का?
इंग्रजी ही सर्वमान्य भाषा झालेली आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेला महत्त्व नाही, असे अजिबातच नाही. पण, मराठी भाषेला प्राधान्य दिले गेले पाहिजे. मराठी भाषा, मराठी संस्कृती यांची जपणूक झालीच पाहिजे. मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रेम राहिलेले नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. 

तरुण कलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभव ?
हल्लीचे तरुण कलाकार हे गुणवत्तेत आमच्या काळातील तरुण कलाकारांहून उजवे आहेत, असे वाटते. तंत्रज्ञान, विविध समाज माध्यमे यांचा पुरेपूर वापर करून, फायदा करून घेणे या पिढीला शक्य आहे. ते करण्याची त्यांची तयारी आहे. अशा कलाकारांसह काम करायला आपोआपच मजा येते. 

बातम्या आणखी आहेत...