आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Sunil Shetty Said, "I Wanted To Play Vivian Richards Role In The Film '83' ..."

क्रिकेटचे वेड असलेला सुनील शेट्टी म्हणाला, 'मी चित्रपट '83'मध्ये विवियन रिचर्ड्सचा रोल करू इच्छित होतो...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कबीर खानचा चित्रपट '83' चे शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. फिल्मची कास्ट आणि क्रू मंगळवारी याच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग साठी लंडनला रवाना झाले आहेत. फिल्ममध्ये वेस्टइंडीजचे लेजेंड्री प्लेयर्सचे कास्टिंग इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट क्लबमधून होत आहे. याचदरम्यान सुनील शेट्टीने एक इच्छा व्यक्त केली आहे की, त्याला फिल्ममध्ये विवियन रिचर्ड्सचा रोल प्ले करायचा होता.  

 

मी आता म्हातारा होत आहे : सुनील... 
आपल्या या ड्रीम रोलबद्दल सुनील शेट्टी म्हणाला, विवियन रिचर्ड्स त्या काळातील सर्वात डायनॅमिक आणि कॉन्फिडेट प्लेयर्सपैकी एक होते. मी त्यांचा रोल नक्की केला असता. आताही जेव्हा याच्या कास्टिंगच्या बातम्या ऐकतो तेव्हा मला जाणवते की, मी आता म्हातारा होतो आहे. वाईट या गोष्टीचे वाटत आहे की, बायोपिक तेव्हा बनते आहे, जेव्हा आमच्यासारखे कलाकार म्हातारे होत आहेत. आता तर आम्हाला कुणी अंपायरिंगसाठीही उभे करणार नाही. तरीही मला या फिल्ममध्ये एखादा छोटा-सा जरी रोल मिळाला असता तरी मी केला असता.’

 

वाटायचे की, माझा मुलगा अहानने देशासाठी एखादे स्पोर्ट्स खेळावे...  
मुलगा अहानबद्दल सुनील म्हणाला, ‘अहान सात-आठ वर्षांच्या वयापर्यंत तर चांगला क्रिकेट खेळायचा पण नंतर मग तो शिक्षणासाठी अमेरिकेला चालल्या गेला आणि तेथे क्रिकेटचे कल्चरच नाही तर फुटबॉलमध्ये घुसला. माझे तर स्वप्न हेच होते की, त्याने देशासाठी एखादे स्पोर्ट्स खेळावे कारण माझ्यासाठी तर खरे हिरो तेच आहेत ज्यांना नेशन फॉलो करते. खरा हीरो युद्धभूमीवर लढणारे सैनिक आणि खेळाच्या मैदानात देशाचे नाव मोठे करणारा खेळाडू आहे.’

बातम्या आणखी आहेत...