आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराणेशाही आणि लग्न फक्त बाहेरूनच ग्लॅमरस दिसते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकी कौशलचा भाऊ सनी कौशल सध्या आपल्या आगामी 'भंगड़ा पा ले'चित्रपटाच्या प्रमोशनात व्यग्र आहे. त्यातच त्याने आपल्या स्टँडअप कॉमेडीचा व्हिडिओदेखील रिलीज केला. यात त्याने सिनेमातील घराणेशाही आणि लग्नाची तुलना केली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सनी म्हणतो..., 'इंडस्ट्रीमध्ये दाेन सनी आधीपासून आहेत, जे अॅक्शन करतात, आणि मी सनी कौशल सुपरस्टार विक्की कौशलचा छोटा भाऊ आहे.' यानंतर ताे स्वत: कडे लक्ष वेधत म्हणताे, 'नेपोटिझम, तुम्हाला माहित आहे ॽ नेपोटिझम आणि लग्न हे बाहेरूनच मोहक वाटते, मात्र आतून कसे आहे ते आम्हालाच कळते. पण माझे असे ठाम मत आहे की, जर तुमच्यात प्रतिभा असेल तर वडिलांचे, भावाचे आणि आजोबांची घराणेशाही कामी येत नाही. फक्त प्रेक्षकांचे प्रेम कामी येते आणि या प्रेमाची आपल्याला गरज आहे. तर नक्कीच पाहा आमचा चित्रपट. नाहीतर हा नवा हिंदुस्थान आहे .. घरात प्रवेशही करेल आणि विनंतीही करेल. सनीचा हा चित्रपट पुढील वर्षी 3 जानेवारीला रिलीज होणार आहे.

पंजाबमधील रिअल लोकेशनवर झाले चित्रीकरण

सनीसेाबत या चित्रपटात रुखसार ढिल्लनदेखील दिसणार आहे. देसी शैली आणि भंगडावर आधारित या चित्रपटाचे शूटिंग पंजाबच्या रिअल लोकेशनवर झाले आहे. निर्मात्यांनी याचे शूटिंग पंजाबमधील प्रसिद्ध खालसा कॉलेज पासून ते हिरव्यागार शेतात केले आहे.

बातम्या आणखी आहेत...