आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग तारखा जुळल्या तर नक्कीच करेन 'चंदा मामा दूर के' : सुशांत सिंह राजपूत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. सुशांतसिंह राजपूतच्या आगामी 'सोन चिरैया' चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले. यात त्याच्या वेगळ्या लूकचे कौतुक होत आहे. एका मुलाखतीत सुशांतने सांगितले की, सध्या त्याच्याकडे 12 चित्रपटांच्या ऑफर आहेत. सुशांतसिंह राजपूतचे अनेक चित्रपट बंद होणार आहेत अशी चर्चा गेल्या वर्षी होती, मात्र नवीन वर्षांत त्याचे दैव पालटले. आधी धर्मा प्रॉडक्शन्सने जॅकलिन फर्नांडिससोबत त्याच्या 'ड्राइव्ह'च्या रिलीज डेटची घोषणा केली. आता स्वत: सुशांतने स्पेस 'चंदा मामा दूर के'त काम करणार असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला..., तारखा जुळल्या तर हा चित्रपट मी नक्कीच करणार. सध्या माझ्याकडे १२ चित्रपटांची आॅफर आहे. यापैकी कोणता आधी सुरू करावा, हेच कळेना. विशेष म्हणजे 'चंदा माम दूर के' आणि पॅरालिंपिक मुरलीकांत पेटकरचा बायोपिक अजूनही पाइपलाइनमध्ये आहे. पुढचा चित्रपट मलाच ठरवावा लागणार आहे. 

 

सुशांत म्हणाला...
आम्ही नुकतेच 'ड्राइव्ह' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. त्याचे व्हीएफएक्स वर्क उरले होते. त्यामुळे या चित्रपटाला उशीर झाला होता. गेल्या वर्षी सप्टंेबरमध्येच हा चित्रपट रिलीज होणार होता. मात्र आता आम्ही २८ जून रोजी रिलीज करणार आहोत. 

 

'चंदा मामा दूर के'च्या प्रश्नावर सुशांत म्हणाला...
- हा चित्रपट नक्कीच बनणार याची मला पहिल्यापासून खात्री होती. या चित्रपटावर मी आणि दिग्दर्शक संजय पूरण सिंग यांनी खूप काम केले. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे.याची कथा खूपच चांगली आहे, हा चित्रपट बनायलाच हवा. यावर आम्ही काम करणार नाही, असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. आमच्या तारखा जुळल्या तर आम्ही नक्कीच यावर काम करू. खरं तर, मी असो किंवा नसो, हा चित्रपट बनायला हवा. खरं तर, अायुष्यात मला काय-काय करायचं आहे, हे अजून मी ठरवलं नाही, हीच मोठी अडचण आहे. खरं तर, मला काय- काय आवडतं हेच अजून माहीत नाही. 

- सुशांतने गेल्या वर्षी केरळ आणि नागालँडच्या पुरग्रस्ताना १-१ कोटी रुपये दान दिले होते. यावर्षीदेखील तो समाजासाठी खूप काही करू इच्छित आहे. तो म्हणतो, समाज आणि जीवनाने मला खूप काही दिले. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. बिहारमध्ये दरवर्षी पूर येतो. 
- यात त्या लोकांची काही चूक नाही. तेथील भौगोलिक परिस्थिती तशी आहे. पुढे सरकार, एनजीओ आणि इतर संस्थांच्या मदतीने मी यावर स्थायी समाधान शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. 

 

अंतराळावर आधारित चित्रपट 
गेल्या वर्षी रिलीज झालेला तामिळ चित्रपट 'टिक टिक टिक' ला देशाचा पहिला सर्वात मोठा अंतराळावर अाधारित चित्रपट म्हटले जाते.तरीदेखील तीन चित्रपटांवर काम होत आहे. माधवन स्टारर 'रॉकेट्री', शाहरुख स्टारर 'सारे जहां से अच्छा' अाणि अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'मिशन मंगल'. 

बातम्या आणखी आहेत...