आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभव झाला तरीही राजकारण सोडणार नाही म्हणणाऱ्या उर्मिला मातोंडकरची काँग्रेसला सोडचिठ्ठी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री ते राजकारणी बनलेल्या उर्मिला मातोंडकरने आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतगर्त राजकारणाला कंटाळून तिने हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत उर्मिला काँग्रेसचा हात धरला होता. काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर जोरदार प्रचार देखील केला. परंतु, निवडणुकीत विजयी होता आले नाही. यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण असल्याचे तिच्या लक्षात आले. काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असले तरीही राजकारण सोडणार नाही असे उर्मिलाने म्हटले होते. तरीही उर्मिला अवघ्या 4 ते 5 महिन्यांतच राजकारणापासून हात लांब केले.

हे आहे राजीनाम्याचे कारण...
उर्मिलाने आपल्या राजीनाम्याची माहिती जाहीर करताना एक प्रेस नोट जारी केला. त्यानुसार, पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून तिने 16 मे रोजीच आपला राजीनामा देण्याचा विचार केला होता. तत्कालीन मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही काहीच कारवाई केली नाही. यांनतर पक्षाला पाठवलेले एक गुप्त पत्र सोशल मीडियावर लीक करण्यात आले. तिने हा प्रकार एक विश्वासघात असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर काँग्रेसच्या कुठल्याही व्यक्तीने तिची माफी मागितली नाही. उलट, तिने लोकसभा निवडणुकीत आपल्या पराभवासाठी ज्या-ज्या लोकांना जबाबदार धरले होते. त्या सर्वांवर कारवाई करणे सोडून महत्वाची पदे देण्यात आली. त्यामुळेच आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे उर्मिला मातोंडकरने स्पष्ट केले आहे. सोबतच, आपल्याला समर्थन देणारे कार्यकर्ते, मतदार आणि मीडियाला सुद्धा तिने धन्यवाद म्हटले आहे.