आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार वैभव तत्त्ववादी, हे आहे फिल्मचे नाव 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता वैभव तत्ववादी सध्या त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. स्वतः वैभवने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या नवीन प्रोजेक्टविषयीची माहिती दिली असून यात तो बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करतोय. या अभिनेत्रीचे नाव आहे काजोल. 'त्रिभंगा' हे वैभवच्या नवीन चित्रपटाचे नाव असून नेटफ्लिक्सवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

मुंबईतील एका कुटुंबाची कथा या चित्रपटात रेखाटण्यात येणार आहे. 1980 च्या दशकापासून आतापर्यंत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची कथा व त्यांच्या जीवनाशी निगडीत समस्या दाखवले जाणार आहेत.

वैभव तत्ववादीने आतापर्यंत 'कॉफी आणि बरंच काही', 'व्हॉट्सअप लग्न' यांसारख्या दर्जेदार मराठी चित्रपटांमध्ये एकदम उत्तम अशा भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्याने 'बाजीराव मस्तानी', 'मणिकर्णिका', 'हंटर' या हिंदी चित्रपटांमध्ये स्वतःच्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे. आता तो लवकरच 'पाँडिचेरी' या मराठी चित्रपटात सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकरसोबत झळकणार आहे.

हिंदीत तो अभिनेत्री विद्या बालनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये वैभव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.