आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेन्ट डेस्क : कतरिना कैफ, विक्की कौशल आणि सलमान खान यांचा एक वीडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका अवॉर्ड फंक्शनचा आहे. जेव्हा कतरिना अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर आली. तेव्हा अवॉर्ड शो होस्ट करत असलेला विक्की कौशल, तिच्यासोबत मस्ती-मजाक करताना दिसला. जेव्हा तो कतरिनासोबत बोलत होता तेव्हा सलमान खानही तिथेच होता. विक्कीने कतरिनाला सर्वांच्या समोर विचारले - 'मुझसे शादी करोगी'. हे ऐकल्यानंतर सलमानची रिअक्शन पाहण्यासारखी होती. विक्कीचे प्रपोजल ऐकून
सलमानने बेशुद्ध होण्याचा ड्रामा केला.
- विक्कीचा प्रश ऐकून कतरिना काही वेळ तर गप्प राहिली, मग ती म्हणाली - 'हिम्मत नाही'. हे ऐकून सलमान खूप हैराण झाला आणि यामुळे खुश झाला की, कतरिनाने विक्की कौशलचे प्रपोजल झिडकारले.
- एकदा करण जौहरचा चॅट शो 'कॉफी विद करण' मध्ये जेव्हा कतरिनाला विचारले गेले होते की, तिला नवीन जनरेशनमधील कुणासोबत स्क्रीन शेयर करायला आवडेल. तेव्हा तिने विक्कीचे नाव घेतले होते. यानंतर जेव्हा विक्की 'कॉफी विद करण' वर पोहोचला तेव्हा त्याला हे सांगितले गेले तर त्याने हे ऐकून बेशुद्ध होण्याचा ड्रामा केला होता.
ईदला येणार आहे कतरिनाचा चित्रपट 'भारत'
कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या फिल्म 'भारत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या फिल्ममध्ये ती सलमानसोबत लीड रोलमध्ये आहे. फिल्ममध्ये जॅकी श्रॉफ, तब्बू, सुनील ग्रोवर, दिशा पाटनी आणि नोरा फतेही हेदेखी आहेत. फिल्मचे 80 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. ही फिल्म याचवर्षी जूनमध्ये ईदला रिलीज होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.