आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : तमिळ अभिनेता विजयने आपला अपकमिंग चित्रपट 'बिगिल' चे शूटिंग संपल्याच्या आनंदात प्रत्येक क्रू मेंबर्सला सोन्याची अंगठी गिफ्ट म्हणून दिली. जसे मंगळवारी दुपारी चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल संपले, विजयने याच्याशी निगडित 400 लोकांना अंगठी गिफ्ट केली. यावर चित्रपटाचे नाव 'Bigil' (इंग्रजीमध्ये) लिहिले आहे.
निर्माती अर्चनाने केले ट्वीट...
एजीएस सिनेमाची सीईओ आणि 'बिगिल' ची निर्माती अर्चना कुलपतीने ट्विटरवर याची माहिती दिली. तिने लिहिले, 'हे प्रेमळ गिफ्ट देऊन विजयने सर्वांचे मन जिंकले.'
चित्रपटातील एक अभिनेता आथमाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून गिफ्ट म्हणून मिळालेली अंगठी दाखवत विजयचे आभार मानले. तो म्हणाला, "देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदी ठेवो."
शाहरुखदेखील चित्रपटात दिसणार आहे...
- हा चित्रपट याचवर्षी दिवाळीला रिलीज होणार आहे. विजयसोबत या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा आणि शाहरुख हेदेखील दिसणार आहेत. याचे पहिले पोस्टर विजयचा बर्थडे म्हणजेच 21 जूनला रिलीज केले गेले होते. यामध्ये विजय वडील आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत आहे.
- शाहरुख खान व्हिलनच्या रोलमध्ये दिसडणार आहेत. त्याचा रोल खूप छोटा असेल. एका इंग्रजी वेबसाइटनुसार, तो क्लायमॅक्समध्ये दिसणार आहे. त्याचा आणि विजयचा एक फायटिंग सीन असेल. अंदाज लावले जात आहेत की, दोन्ही अभिनेते एका स्पेशल गाण्यामध्येदेखील एकत्र दिसू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.