आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांपासून बेपत्ता आहे संजय दत्तसोबत काम केलेला बॉलिवूड अभिनेता, पोलिसही लावू शकले नाही काही पत्ता, आईकडून पैसे घेऊन फिल्म पाहायला निघाला होता, नंतर कधीच परतला नाही घरी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सीरियल 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये छोट्याशा रोलमध्ये दिसलेला अभिनेता विशाल ठक्करला गायब होऊन 3 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. 1 जानेवारी 2016 च्या सकाळी विशालला त्याच्या गर्लफ्रेंडच्या घराबाहेर गोडबंदर रोड, मुंबई येथे पहिले गेले होते. तो कुठे आहे ? कशा परिस्थितीत आहे ? या प्रश्नांची उत्तरे कुणाकडेच नाहीत. मात्र, त्याची आई दुर्गा ठक्कर रोज मुलगा परतण्याची वाट पहाटे आहे. DainikBhaskar.com सोबतच्या खास बातचीतीमध्ये दुर्गा ठक्कर म्हणाल्या, "रोज सकाळी मी या आशेने उठते की आज माझा मूलगा परत येईल किंवा फोन करेल. पूर्ण 3 वर्ष झाले आहे, पण मुलगा अजूनही गायब आहे. पोलीस अथॉरिटीकडे विशालबद्दल कोणतेच कन्फर्मेशन नाही. ते स्वतःच क्लूलेस आहेत. मात्र, माही अशा सोडणार नाही. मला माहित आहे की एक दिवस माझा मुलगा परत येईल". 

 

गायब होण्याच्या दोन महिन्यापूर्वी लागला होता रेपचा आरोप... 
- ऑक्टोबर 2015 मध्ये विशालच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर रेप, विश्वासघात केल्याचा आणि असॉल्ट केल्याचा आरोप लावला होता. पोलिसांना दिलेल्या स्टेट्मेंट्मधे पीड़ित अभिनेत्रीने सांगितले होते की ती विशालसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. नंतर विशालच्या वाईट वागणुकीमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. अभिनेत्री म्हणाली, 'विशालने आपल्या बर्थडेच्या दिवशी मला चारकोपमधील आपल्या अपार्टमेंटमध्ये बोलावले आणि माफी मागून हे नाते पूर्ववत सुरु करायचे तो म्हणत होता. यादरम्यान विशालने माझे शारीरिक शोषण केले". अभिनेत्रीनुसार, ती कशीतरी तेथून सुटली आणि जवळच्याच स्टेशनमध्ये जाऊन विशालविरुद्ध FIR दाखल केली.  
- तक्रारीत अभिनेत्री म्हणाली होती की, विशालने तिला लग्नाचे वाचन दिले होते. पण फिजिकल रिलेशन बनवल्यानंतरही तो त्या नात्याला पुढे नेट नव्हता. या बाबतीत विशालची आई दुर्गा ठक्कर म्हणाल्या, "आपल्या गर्लफ्रेंडविषयी विशालचा कुठलाही वाईट हेतू नव्हता. इनफॅक्ट ती आमच्या घरात राहत होती. अनेकदा मी तिला माझ्या बेडरूम मध्ये झोपवायचे. माझा मुलगा तिच्याशी लग्न करू इच्छित होता पण काही महिन्यांनंतर विशालला कळाले की, ती कुना दुसऱ्यासोबत मिळून त्याला फसवत आहे". 
- दुर्गा ठक्कर "तिने विशालला धमकावणे सुरु केले आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्या मुलाविरुद्ध तक्रार नोंदवली. तिने विशालवर रेप केल्याचा आरोप लावला, जे खरे नव्हते. तिने केलेले सर्व आरोप खोटे आहेत. काही दिवसांनी आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर तिने आपली तक्रार मागे घेतली. एवढेच नाही, त्यांनंतरही ती विशालच्या सतत टचमध्ये होती. पण  माहित नाही की माझा मुलगा कुठे आहे "

 

1 जानेवरी 2016 पासून बेपत्ता आहे विशाल...  
- विशालच्या आईने सांगितले की, "रेपचा आरोप झाल्यानंतर माझा मुलगा खूप डिप्रेशनमध्ये होता. तो एकदम गप्पगप्प राहू लागला. तो काम करू इच्छित होता पण रेपच्या आरोपाने त्याची इमेज खराब केली होती. त्याला कोणतेच काम मिळत नव्हते. घरी आम्ही त्याला डिप्रेशनमधून काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण अचानक तो गायब झाला. मला वाटते की ती मुलगी त्याला अजूनही धमकावत आहे आणि घरी परतु देत नाही. मला न्याय व्यवस्थावर पूर्ण विश्वास आहे. मला वाटते की पोलिसांनी गंभीरतेणे माझ्या मुलाचा तपस करावा" 
- विशाल ठक्कर 1 जानेवरी 2016 पासून बेपत्ता आहे. त्यावेळी त्याच्या आईने सांगितले होते की 31 डिसेंबरच्या रात्री तो त्यांच्यासोबतच होता. नंतर तो सिनेमा पाहायचा म्हणून घराबाहेर पडला आणि परत आलाच नाही, ना विशालशी काही संपर्क होऊ शकला आहे.  
- 6 जानेवरी 2016 ला चारकोप पोलीस स्टेशनमध्ये विशाल हरवल्याची तक्रार दाखल केली गेली होती. पण अद्याप पोलिसांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

 

या सीरियल आणि चित्रपटांत केले विशालने काम... 
- विशालने टीव्हीवर 'पड़ोसन' (2009), 'जय बजरंगबली' (2011) आणि 'थपकी प्यार की' (2015) अशा सीरियल्समध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त, 'चांदनी बार' (2001) 'मुन्नाभाई एमबीबीएस' (2003) आणि 'टैंगो चार्ली' (2005) अशा चित्रपटांमध्येही तो दिसला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...