आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका फिल्मने रात्रीतून स्टार बनली होती ही अभिनेत्री, पण एका कार अक्सीडेंटने हिरावून घेतले सर्वकाही, 29 दिवस कोमामध्ये राहिली तर डॉक्टर्स म्हणाले, 'या वाचणार नाहीत', पण 3 वर्ष चाललेल्या उपचाराने दिली मृत्यूला मात 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 1990 मध्ये आलेली फिल्म 'आशिकी' ने रात्रीतून स्टार बनलेली अनु अग्रवाल 11 जानेवारीला 50 वर्षांची झाली आहे. या फिल्मनंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. पण कोणत्याच चित्रपटात 'आशिकी' सारखी पॉप्युलॅरीटी नाही मिळाली. आता ग्लॅमर वर्ल्डपासून दूर अनु झोपड़ीमध्ये जाऊन गरीब मुलांना फ्री योगा शिकवते. ज्याचे फोटोज ती अनेकदा आपल्या सोशल हैंडलवर शेयर करते. एप्रिल 2018 झालेल्या महेश भटच्या प्रोडक्शन हाउस विशेष फिल्म्सची 30 वी अनिवर्सरीच्या पार्टीमध्ये आशिकी फेम अनु अग्रवालला शेवटचे पहिले गेले होते.  

 

29 दिवस कोमामध्ये राहिली अनु...
- 1996 नंतर फिल्मी दुनियेतुन गायब होऊन अनुने योगा आणि अध्यात्मकडे वळली. याचदरम्यान 1999 मध्ये एका रोड अक्सीडेंटने अनुची लाइफच बदलून टाकली. या घटनेनंतर तिची स्मृती गेली होती, आणि पॅरालाइज्ड झाली होती.  
- जवळपास 29 दिवस ती कोमामध्ये राहिल्यानंतर जेव्हा अनु शुद्धीत आली, तेव्हा ती स्वतःला पूर्णपणे विसरून गेली होती. स्मृती गेलेल्या अनुची तो तिचा पुनर्जन्मच होता. 3 वर्ष चाललेल्या ट्रीटमेंटनंतर तिची स्मृती परत आली.  
- अनुने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते, "बॉलीवूडला निरोप दिल्यानंतर मी आता योगाकडे लक्ष देत आहे. मी आधीपासूनच योगा करायचे. 1997 मध्ये उत्तराखंडच्या आश्रमात मी योगा शिकले. पण 1999 मध्ये माझा कार अक्सीडेंट झाला, 29 दिवस कोमामध्ये राहिले. डॉक्टरने माझ्या पेरेंटसला सांगितले होते की ही कोमामधेच मारून जाईल. पण मी हार मानली नाही आणि या सर्वात योगाने माझी सर्वात जास्त मदत केली". 
- अनुने आपली कहाणी आत्‍मकथा 'अनयूजवल : मेमोइर ऑफ ए गर्ल हू केम बैक फ्रॉम डेड' मध्ये लिहिली आहे. सध्या अनु अग्रवाल एक फाउंडेशन चालवत आहे, ज्याचे नाव अनु अग्रवाल फाउंडेशन (AAF- Anu Aggarwal Foundation) आहे. यामध्ये ती मुंबईच्या झोपडपट्टीतील मुलांना नि:शुल्क योगा शिकवते. 

 

21 व्या वर्षी मिळाला होता ब्रेक... 
- 11 जानेवारी 1969 ला दिल्लीमध्ये जन्मलेली अनु अग्रवालने दिल्ली यूनिवर्सिटीमधून समाजशास्त्रचे शिक्षण घेतले आहे. यादरम्यानच अनुला महेश भट यांनी आपली फिल्म ‘आशिकी’ मध्ये पहिला ब्रेक दिला होता.  
- केवळ 21 व्य वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या अनुने या फिल्मनंतर ऑडियंसच्या मनात जागा मिळवली आणि एका रात्रीत ती स्टार बनली. नंतर ती ‘गजब तमाशा’, ‘खलनायिका’, ‘किंग अंकल’, ‘कन्यादान’, ‘बीपीएल ओए’ आणि ‘रिटर्न टू ज्वेल थीफ’ अशा चित्रपटात दिसली पण एकही फील फारशी चालली नाही. अनुने तामिळ फिल्म ‘थिरुदा-थिरुदा’ आणि शॉर्ट फिल्म ‘द क्लाऊड डोर’ मधेही काम केले आहे. सोबतच काही दिवस ती एम टीव्ही व्हीजेही करत आहे. 

 

जेव्हा वर्ल्ड टूरसाठी निघून गेली अनु... 
- अनुने एका इंटरव्यूमध्ये बॉलिवूड सोडण्याबद्दल सांगितले होते, "1996 पर्यंत काही हिट फिल्म केल्यांनतर माझे वर्ल्ड टूर करण्याचे मन होते. मात्र हे ऐकून माझ्या असिस्टेंटला वाटले मला साइकेट्रिस्टची गरज आहे. खरंच ती वेळ अशी होती जेव्हा प्रोड्यूसर माझ्या घरी बॅग भरून भरून पैसे घेऊन यायचे. मी त्यांच्या फिल्ममध्ये काम करावे म्हणून. पण खरे तर मला आधीपासूनच वाटायचे की मी ही बॉलिवूड टाइप नाही. मी माझे वांद्र्याचे घर आणि माझी कार विकली आणि मी वर्ल्ड टूरला गेले. 
- "अजुनपर्यंत सगळे कान्स फिल्म फेस्टिवलबद्दल बोलतात, मी फिल्मी करियर सोडण्यापूर्वी मी कान्समध्ये माझी फिल्म ‘द क्लाऊड डोर’ शोकेस केली होती. जेव्हा सर्वांसाठी फ्रांसही दूर होते. ‘द क्लाऊड डोर’ मध्ये मी त्यावेळी न्यूड सीन केला होता, मात्र हे खूप कमी लोकांना माहित आहे कारण तेव्हा खूप कमी लोकांना कान्स फेस्टिवल माहित होते". 

बातम्या आणखी आहेत...