आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर : अहानाने प्रियंका गांधीसारखे दिसण्यासाठी एक वर्ष केले नाही ऑयब्रो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : संजय बारू यांचे वादग्रस्त पुस्तक 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' वर आधारित फिल्म याच टायटलसोबत रिलीज झाली आहे. फिल्ममध्ये  गांधी कुटुंबाच्या प्रमुख सदस्यांसोबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना वेगळ्या पद्धतीने पडद्यावर साकारले आहे. फिल्ममध्ये प्रियांका गांधीचा रोल करणारी अक्ट्रेस अहाना कुमराचेही आपल्या लूकसाठी खूप कौतुक झाले. अहानाने एका इंटरव्यूमध्ये सांगितले, प्रियांका गांधींसारख्या लूक मिळवण्यात ती कशी यशस्वी झाली. 

 

एक वर्ष नाही बनवली थ्रेड... 
एंटरटेन्मेंट वेबसाइट बॉलिवूड लाइफला दिलेल्या एका इंटरव्यूदरम्यान अहानाने सांगितले की, जेव्हती पहिल्यांदा लुक टेस्टसाठी पोहोचली तेव्हा तिचा मेकअप आर्टिस्टने तिला आयब्रोची ग्रूमिंग करण्याला मनाई केली होती. आता जवळपास एक वर्ष झाले आहे जेव्हा मी आयब्रो थ्रेड केले आहे. 

 

फर्स्ट लुक पाहून झाली होती दंग... 
अहानाने सांगितले की, सुरुवातीला मला विश्वास नव्हता की मी प्रियंका गांधीसारखी दिसू शकते. पण प्रत्येकजण म्हणाला की, मी जवळपास त्यांच्यासारखीच दिसते आणि जेव्हा मी पहिल्यांदा प्रियांका गांधीच्या रूपातला माझा पहिला लुक पहिला तेव्हा माझ्या तोंडून केवळ इतकेच निघाले, 'ओ माय गॉड'.  

 

प्रियांकाला भेटण्याची आहे इच्छा... 
फिल्ममध्ये प्रियांकाची भूमिका निभावणारी अभिनेत्री अहाना स्वतः प्रियंका गांधीला भेटू इच्छिते. अहानाला राजकारणाशी निगडित चित्रपटात काम करण्याची इच्छा होती आणि तिला ती संधी विजय रत्नाकर गुट्‌टे यांच्यामुळे मिळाली. एवढेच नाही तर शूटिंग सुरु होईपर्यंत अहानाने फिल्मची स्क्रिप्ट एकदाही वाचली नव्हती.  

 

बातम्या आणखी आहेत...