आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Amy Jackson Gave A Gender Reveal Party, Telling Who Would Be Her Baby, Son Or Daughter ...

अभिनेत्री एमी जॅक्सनने दिली जेंडर रिव्हील पार्टी, सांगितले कोण असणार तिचे बाळ, मुलगा की मुलगी...     

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री एमी जॅक्सन आपल्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. अशातच एमीने आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल एक खुलासा केला आहे. एमीने आपल्या होणाऱ्या बाळाचे जेंडर रिव्हील करण्यासाठी एक पार्टी दिली होती. त्या पार्टीदरम्यान एमीने ओरडून ओरडून सर्वांना सांगितले की, तिला 'बेबी बॉय' होणार आहे. या पार्टीचा हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्रीने आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये 'जेंडर रिव्हील पार्टी' मध्ये अचानक माइकमध्ये ओरडून सांगते आहे की, तिला बेबी बॉय होणार आहे... 
 

 

एमीने सोशल मीडियावरच दिली होती आपल्या प्रेग्नन्सीबद्दल माहिती.... 
तिने याचवर्षी 31 मार्चला आपल्या प्रेग्नन्सीचा खुलासा सोशल मीडियावर केला. इन्स्टाग्रामवर माहिती देत एमीने एक फोटो शेयर करून लिहिले, 'मी माझ्या घराच्या छतावर उभी राहून ओरडू इच्छिते आणि मदर्स डे (31 मार्चला इंग्लंडमध्ये मदर्स डे सेलिब्रेट केला जातो.) च्या दिवशी मला ही संधी मिळाली. मी नेहमीच या जगातील निश्चल आणि पवित्र प्रेमाला महत्व देते. आम्ही तुला भेटण्याची आणखी वाट नाही पाहू शकत आमच्या तूळ राशीच्या बाळा...'

बातम्या आणखी आहेत...