आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात पुढे जाण्यासाठी निवडला शॉर्टकट, अनेक साधू-बाबांसोबत बनवले शारिरीक संबंध, एके दिवशी आला एक कॉल आणि दुसऱ्या दिवशी मिळाला मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रायपूर(छत्तीसगड)- 25 मार्चला छॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडल आंचल यादव हत्याकांडाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी आता राजधानीत तिच्या व्हीआयपी रोडवरील फ्लॉवर व्हॅलीमधल्या घरावर फोकस केले आहे. पोलिसांच्या तपासात या घरात काही हार्ड ड्राइव्ह आणि चीप्स मिळाल्या आहेत. येथील तपासात आंचलचे बंगालच्या एका बाबासोबत संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत. 


असे मानले जात आहे की, या बाबाच्या माध्यमातून आंचल कोणत्यातरी सिद्धी मिळवण्याच्या मार्गावर होती. काही दिवसांनंतर तिला कळाले की, बाबा खोटा आहे, आणि तिने दिल्लीतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्नदेखील केला होता. दोन महिन्यांपूर्वी आंचल अनेक पोलिस अधिकाऱ्यांना भेटली होती आणि त्या बाबाबद्दल सांगितले होते. तिने लिखीत तक्रार केली नव्हती, म्हणून पोलिसांना पुढचा तपास करता आला नाही. 


कॉल डिटेलमध्ये पुरावे
आंचल हत्याकांडसंबंधीचे काही ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पण पोलिसांनी याबाबत काहीच वक्तव्य केलेले नाहीये, पण असे सांगितले जात आहे की, येत्या काही दिवसांत या प्रकरणाताली आरोपीला ताब्यात घेण्यात येईल. सध्या पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...