आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress And MP Nusrat Jahan Celebrates The Teej Festival For The First Time After Her Marriage

लग्नानंतर पहिल्यांदा तीज हा सण साजरा करत आहे अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां, सोशल मीडियावर झाली ट्रोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून पहिल्यांदा खासदार बनलेली बंगाली चित्रपटांतील अभिनेत्री नुसरत जहां 19 जूनला विवाहबद्ध झाली. लग्नानंतर ती आपली पहिला तीज सण साजरा करत आहे. तीज सेलिब्रेशनचे काही फोटोज नुसरतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये नुसरत आपला पती निखिल जैनसोबत दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'माझा पहिला सिंधारा अविस्मरणीय बनवण्यासाठी धन्यवाद. नुसरतचा पती निखिल जैन कलकत्त्यातील प्रसिद्ध बिजनेसमन आहे, ज्याचा टेक्सटाइलचा मोठा व्यवसाय आहे. नुसरत त्याची टेक्सटाइल चेन 'रंगोली' ची ब्रांड एंबेसडरदेखील आहे. 
 

सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल झाली नुसरत... 
नुसरतचे तीज साजरे करणे सोशल मीडिया ट्रोलर्सला आवडलेले नाही. त्यांनी फोटोजवर नुसरतविरुद्ध द्वेषाने भरलेले कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले, 'तू हिंदू आहेस की, मुस्लिम?' आणखी एका यूजरने लिहिले, 'लाज नाही वाटली, इस्लामचा संदेश विसरली का ?' दुसऱ्या एका यूजरने लिहिले, 'मुस्लिम असून हिंदूंसारखे सिंदूर लावतेस तू, तुझी लाज वाटते.' 

बातम्या आणखी आहेत...