आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बागी 3' नंतर दुसऱ्या चित्रपटावर काम करतेय अभिनेत्री अंकिता लोखंडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'बागी ३' चित्रपटाच्या शूटिंगसाठी अंकिता लोखंडे जयपूरला गेली होती. या चित्रपटात श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, रितेश देशमुख दिसणार आहेत. जयपूरमधील बागी चित्रपटाचे काम आटपून ती पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जम्मूला रवाना झाली आहे. या चित्रपटाबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. हा चित्रपट तिच्या चाहत्यांसाठी सरप्राइज ठरेल. याविषयी अंकिता म्हणते, गेल्या वर्षी चाहत्यांकडून मला चांगला प्रतिसाद मिळाला. या वर्षीदेखील मला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. नवीन वर्षात 'बागी 3'ने माझी सुरुवात झाली. चित्रपटाची स्क्रिप्ट दमदार असून माझी भूमिकादेखील आव्हानात्मक आहे. चित्रपटाची ही यशस्वी शृंखला ठरली. त्यामुळे माझ्यावरही मोठी जबाबदारी होती. यातील काम करून उत्साहित आहे.. बागी चित्रपटातील काम संपवून नवीन चित्रपटासाठी मी जयपूरहून जम्मूला रवाना झाले आहे. हा क्षण माझ्यासाठी खूप आनंददायी आहे.