आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Anushka Sharma Reached Leeds To Watch India Sri Lanka Match And Cheers Indian Team

भारत-श्रीलंकेची मॅच पाहण्यासाठी लीड्सला पोहोचली अभिनेत्री अनुष्का शर्मा, भारताला चियर करताना दिसली 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
एंटरटेन्मेंट डेस्क : वर्ल्डकप 2019 मध्ये शनिवारी भारत आणि श्रीलंका यांच्या मधील सामना झाला. या सामन्यामध्ये भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा भारत-श्रीलंकेची मॅच पाहण्यासाठी लीड्सला पोहोचली. अनुष्काने यावेळी टीम इंडियाला खूप चियर केले. यावेळी टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहदेखील लीड्सलं पोहोचली होती. मैदानावरून अनुष्का शर्माचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

 

व्हिडिओमध्ये खूप मस्ती करताना दिसली अनुष्का... 
एका व्हिडिओमध्ये अनुष्का पंजाबी गाणे 'तारे गिन गिन' वर एन्जॉय करताना दिसली. मॅचमध्ये गुंग असलेल्या अनुष्कावर कॅमेरा होता. अचानक तिची नजर कॅमेऱ्यावर पडली. तेव्हा तिला कळले की, तिचे हे नाचणे आणि हसणे कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे. तिने कॅमेऱ्याकडे पहिले आणि त्याच्याकडे पाहून इशारा केला आणि हसू लागली. तिच्या या एन्जॉयमेंटचे व्हिडीओज तिच्या इंस्टाग्रामच्या फॅन पेजवर शेअर केले गेले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...