आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. अनुष्का शर्मा लवकरच शाहरुख खानसोबत आगामी चित्रपट 'झिरो'मध्ये दिसणार आहे. यापुर्वी वरुण धवनसोबतच्या तिच्या 'सुई धागा' चित्रपटाने चांगली कमाई केली होती. याच काळात अनुष्कासाठी एक चांगली बातमी आहे. अनुष्का शर्माचा व्हॅक्स स्टॅच्यू सोमवारी सिंगापुरमध्ये रिवील करण्यात आला. या खास प्रसंगी स्वतः अनुष्का शर्मा तिथे उपस्थित होती. अनुष्का आपला स्टॅच्यू पाहून हैराण झाली. अनुष्काचा व्हॅक्स स्टॅच्यू खुप सफाईदारपणे तयार करण्यात आला आहे. यामुळे तिच्या आणि स्टॅच्यूमधील अंतर ओळखणे कठीण झाले आहे.
स्वतः घेतला सेल्फी
सोशल मीडियावर अनुष्काच्या व्हॅक्स स्टॅच्यूचा फोटो व्हायरल होत आहे. अनुष्काच्या व्हॅक्स स्टॅच्यूमध्ये ग्रे सिल्वर रंगाच्या गाउनमध्ये दिसतेय आणि तिच्या हातात फोन आहे. यामधून ती सेल्फी घेताना दिसतेय. यासोबतच अनुष्काच्या व्हॅक्स स्टॅच्यूच्या गळ्यात नेकलेस आणि कानात इयररिंग्स आहेत. या दोघींना पाहून खरी अनुष्का कोण हे ओळखणे कठीण झाले आहे. सेल्फी घेतानाची अनुष्का या स्टॅच्यूमध्ये दाखवण्यात आली आहे. अनुष्कानेही स्वतःच्या पुतळ्यासोबत फोटो काढला. यावेळी ती ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली.
अनुष्कासोबतच या सेलेब्सचे स्टॅच्यूसुध्दा
अनुष्का बॉलिवूच्या प्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक आहे. मादाम तुसाद म्यूझियममध्ये जगभरात प्रसिध्द असणा-या लोकांचे पुतळे लावण्यात येतात. अनुष्काची प्रसिध्दी पाहता तिचा पुतळाही येथे आहे. सिंगापुरच्या मादाम तुसादमध्ये अनुष्कासोबतच रोनाल्डो, लेविस हॅमिल्टन आणि ओप्रा विन्फ्रे सारख्या सेलेब्सचे फोटोदेखील आहेत.
बॉलिवूडमधील या व्यक्तींचे स्टॅच्यू मादाम तुसादमध्ये आहेत
मादाम तुसादमध्ये स्वतःचा स्टॅच्यू असणे सन्मानाची गोष्ट आहे. बॉलिवूड सेलेब्सचा सन्मान करण्याची ही परंपरा मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून सुरु झाली. 2000 मध्ये त्यांना लंडनच्या मादाम तुसादमध्ये दूसरे प्रसिध्द सेलिब्रिटीजच्या व्हॅक्स स्टॅच्यूमध्ये राहण्याचा विशेष अधिकार मिळाला. अमिताभनंतर त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, ऋतिक रोशन, करीना कपूर, माधुरी दीक्षित, कतरिना कैफ, अनिल कपूर, काजोल, वरुण धवन आणि रणबीर कपूरचे व्हॅक्स स्टॅच्यू लावण्यात आले. दिवंगत अभिनेत्री मधुबाला आता या जगात नाहीत, पण दिल्लीच्या मादाम तुसादमध्ये त्यांचा व्हॅक्स स्टॅच्यू लावण्यात आला आहे.
या स्टार्सचे स्टॅच्यू आता लावण्यात येणार आहे
शाहिद कपूर, दीपिका पदुकोण, करन जोहर, सनी लियोनी आणि दिलजीत दोसांझ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.