आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री भाग्यश्रीच्या आई-वडिलांचे स्वीस बँकेत खाते, नोटीस जारी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्वीस बँकेत असलेल्या भारतीयांच्या खात्यांनी आता “शाही’ वळण घेतले आहे. सांगली येथील शाही कुटुंबातील दोन सदस्यांची माहिती भारतीय तपास अधिकाऱ्यांनी मागवली असून त्यात विजयसिंह माधवराव पटवर्धन आणि त्यांची पत्नी रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांचा समावेश आहे. माजी अभिनेत्री भाग्यश्रीचे हे दांपत्य म्हणजे आई-वडील आहेत.
१९ नोव्हेंबर रोजी यासंबंधीच्या नोटिसा अधिकाऱ्यांनी बजावल्या असून पटवर्धन दांपत्याला चौकशीसाठी १० दिवसांत आपला प्रतिनिधी नेमावा, असे बजावण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यात काही आक्षेप असतील तर तेही कळवावेत, असे नोटिशीत नमूद आहे. 
 

मंगलमूर्ती कंपनीचे मालक

विजयसिंह आणि रोहिणी पटवर्धन हे मंगलमूर्ती इन्व्हेस्टमेंट अँड एक्स्पोर्टस् कंपनीचे मालक आहेत. “सांगली व्हिला’ पत्त्यावर कंपनीचे कार्यालय नोंद आहे. आजोबांचे १९६५ मध्ये निधन झाल्यानंतर विजयसिंह पटवर्धन विजयसिंह राजगादीवर बसले. मात्र, तरुणपणातच ते व्यवसायात उतरले होते.

बातम्या आणखी आहेत...