आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : मॉडेलिंगपासून अभिनयात आलेली बिपाशा बासू आज 39 वर्षाची झाली आहे. बिपाशाचा जन्म 7 जानेवारी 1979 साली दिल्लीत एका बंगाली कुटुंबात झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण नेहरु प्लेस येथील एपीजे हायस्कुलमध्ये झाले. त्यानंतर तिची फॅमिली कोलकात्याला शिफ्ट झाली. मॉडेलिंगमध्ये यश मिळाल्यानंतर बिपाशाने 2001 साली 'अजनबी' या चित्रपटातून डेब्यू केला. या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यू अवॉर्डही मिळाला.
लहानपणी काळी आणि जाडी होती बिपाशा...
भलेही बिपाशाची गणती आज सेक्सी आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये होत असली तरी लहानपणी ती फार जाड आणि काळी होती. त्यावेळी तिला कोणीच सुंदर समजत नसे. एकदा बिपाशाने सांगितले की, शाळेत असताना सर्वजण तिला लेडी गुंडा म्हणून हाक मारत असत.
या चित्रपटात केले आहे काम...
बिपाशाचा पहिला सुपरहिट चित्रपट राज'(2002) होता. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कारासाठई नॉमिनेट करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यं बिपाशाने 55 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. तिने 'आंखे' ( 2002), 'गुनाह' (2002), 'जिस्म' (2003), 'जमीन' (2003), 'एतबार' (2004), 'मदहोशी' (2004), 'फिर हेराफेरी' (2006), 'धूम 2' (2006), 'रेस' (2008), 'आत्मा' (2013)या चित्रपटात काम केले आहे.
या चित्रपटाच्या सेटवर झाली होती करणसोबत मैत्री..
- बिपाशाचा पती करण सिंग ग्रोवर आणि तिची पहिली भेट या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
- शूटिंगदरम्यान त्यांच्यांत मैत्री वाढली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले.
- जवळपास 1 वर्ष डेटींग केल्यानंतर बिपाशाने करणसोबत बंगाली पद्धतीने विवाह केला. या दोघांनी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.