Bollywood / अभिनेत्री कॅमिला मेंडेसचा खुलासा - जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा ड्रग्स देऊन माझे लैंगिक शोषण केले गेले 

अजूनही नाही विसरू शकले तो वाईट अनुभव - अभिनेत्री कॅमिला 

Sep 11,2019 11:45:00 AM IST

हॉलिवूड डेस्क : अमेरिकन टीन ड्रामा 'रिव्हरडेल' फेम अभिनेत्री कॅमिला मेंडेस हिचे म्हणणे आहे की, जेव्हा ती न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती, तेव्हा तिचे लैंगिक शोषण झाले होते. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत 25 वर्षांची कॅमिला म्हणाली, "माझा अनुभव खूप वाईट होता. एका व्यक्तीने ड्रग्स देऊन माझे लैंगिक शोषण केले."

अजूनही नाही विसरू शकले तो वाईट अनुभव
कॅमिलाने मॅगझीनला पुढे सांगितले की, तिच्यासोबत ही घटना तेव्हा घडली, जेव्हा तिने न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीच्या टिस्क स्कूल ऑफ आर्ट्समध्ये अॅडमिशन घेतले होते. कॉलेजच्या पाहिल्याचवर्षी आपल्यासोबत घडलेल्या या वाईट घटनेला ती अद्यापही विसरू शकलेली नाही. कॅमिला म्हणाली, "जेव्हाही मला वाटते की, कठीण काळातून जात आहे, तेव्हा मी विचार करते की, मी शारीरिक स्वरूपात स्वतःसाठी काय करू शकते."

कॅमिलाचा शो 'रिव्हरडेल' चे 3 सीजन यशस्वीरीत्या टेलीकास्ट झाले आहेत. चौथे सीजनदेखील तयार आहे. तिने 'द न्यू रोमँटिक' आणि 'द परफेक्ट डेट' यांसारख्या हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.

X