आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत होळीचे रंग उधळताना नशेत तर्रर्र दारुड्यांने या टीव्ही अॅक्ट्रेसची काढली छेड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- होळीच्या दुसर्‍या दिवशी होळीचे रंग उधळताना नशेत तर्रर्र झालेल्या 10 ते 15 रोड रोमिओंनी मुंबईत टीव्ही अॅक्ट्रेस चाहत खन्ना हिची गाडी अडवली. तिची छेड काढली. यावेळी चाहत खन्ना हिची मुलगीही होती.

 

चाहत खन्ना ही 'कबूल है' आणि 'बड़े अच्छे लगते हैं' या सीरियलमधील तिच्या भूमिकेवरून चर्चेत आली होती.

 

मिळालेली माहिती अशी की, धुलीवंदनच्या दिवशी मुंबईतील मलाड भागात ही घटना घडली. चाहत हिने सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी सात वाजता मित्रांना भेटायला जात होती. काही दारुड्यांनी रस्त्यात तिची गाडी अडवली. ड्रायव्हरने त्यांना बाजुला व्हायला सांगितले असता, सगळ्यांनी त्याला मारहाण केली. नंतर टोळक्याने गाडीची काच फोडली.

 

अॅक्ट्रेससोबत गैरवर्तवणूक..

चाहत हिने सांग‍ितले की, सर्व आरोपी नशेत तर्रर्र होते. चाहत कार बाहेर आल्यानंतर सगळे तिच्या अंगावर धावून आले. तिच्यासोबत गैरवर्तवणूक करु लागले. चाहतने तत्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली. यामुळे नाराज झालेल्या टोळक्याने अॅक्ट्रेसची छेड काढली. चाहतने हाताच चप्पल घेतली आणि एकाला चांगलाच चोप दिला. दरम्यान, याप्रकरणी चाहत हिने अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नाही. पोलिस आपल्या पद्धतीने तपास करत आहेत.