आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अभिनेत्री दिपाली सय्यदने घेतली पूरग्रस्तांच्या 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी; सय्यद फाऊंडेशनच्या माध्यमातून 5 कोटींची मदतही करणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली -अभिनेत्री दिपाली सय्यदने शनिवारी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. सांगलीकरांना अनेकांनी मदत केली आहे पण सांगलीपर्यंत ती पोहोचली नाही. तसेच पुराचे राजकारण करू नये असे त्या यावेळी म्हणाल्या. सांगलीतील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणार असून सय्यद फाऊंडेशनच्या माध्यमातून सांगली पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 

सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात यावेळेस भीषण पूरस्थिती निर्माण झाली. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशात येथील लोकांसमोर संसार उभा करण्यासोबतच मुलींच्या विवाहाची आणि शिक्षणाची मोठी समस्या उभी राहिली आहे. अशा पूरग्रस्त भागातील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा दिपाली सय्यद यांनी केली आहे. 
 

0