आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Esha Deol Got Discharge, Gave Poses To Media With Husband And A Newborn Baby Girl

अभिनेत्री ईशा देओलला मिळाला रुग्णलयातून डिस्चार्ज, पती भरत आणि नवजात मुलीसोबत दिल्या पोज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : दुसऱ्यांदा आई झालेल्या ईशा देओलला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गुरुवारी दुपारी सुमारे 12 वाजता ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी न्यू बोर्न बेबी मीरायासोबत रुग्णलयाबाहेर मीडियाला पोज देताना दिसले. यादरम्यान ईशा आपली मोठी मुलगी राध्याला कडेवर घेऊन चालली होती. तर भरत छोटी मुलगी मीरायाला घेऊन आला. मीरायाचा जन्म 10 जून (सोमवार) ला मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये झाला होता. भरतने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.  

 

मंगळवारी नातीला पाहण्यासाठी आले होते धर्मेंद्र-हेमा... 
मंगळवारी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी नात मीरायाला पाहण्यासाठी रुग्णलयात आले होते. यादरम्यान धर्मेंद्र यांनी पीच करलचे शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. तर हेमा या पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसल्या होत्या. तिसऱ्यांदा आजोबा आजी बनल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 2015 मध्ये ते पहिल्यांदा आजी आजोबा बनले होते, जेव्हा त्यांची धाकटी मुलगी अहानाने मुलगा डेरिन वोहराला जन्म दिला होता. त्यानंतर ईशा 2017 मध्ये पहिल्यांदा आई झाली होती.  

 

ईशाने सांगितला मुलीच्या नावाचा अर्थ... 
बुधवारी एका इंग्रजी एंटरटेनमेंट वेबसाइटसोबत बोलताना ईशाने आपल्या दोन्ही मुलींच्या नावाचा अर्थ सांगितलं. ती म्हणाली होती, "जेव्हा श्री कृष्ण राधेची आराधना करतात, तेव्हा त्याला राध्या म्हंटले जाते. तसेच मीराचा अर्थ श्री कृष्णाची भक्त असा आहे. दोन्ही मुलींच्या नावामध्ये काहीतरी साम्य आहे. जेव्हा दोन्ही नावे एकत्र उच्चारली जातात तेव्हा मला छान वाटते." ईशा आणि भरतने 2012 मध्ये लग्न केले होते. 

बातम्या आणखी आहेत...