आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lakme Fashion Week 2019 मध्ये अभिनेत्री जेनेलिया डिसूजाने केला रॅम्पवॉक, ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली देशमुखांची सून 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : लॅक्मे फॅशन वीक ग्रँड फिनाले रविवारी रात्री झाला. लॅक्मे फॅशन वीक 2019 चा हा ग्रँड फिनाले मुंबईच्या रिचर्डसन & क्रुडासमध्ये झाला होता. या फिनालेमध्ये अनेक अभिनेत्रींनी परफॉर्म केले. अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने तब्बल ५ वर्षानंतर एखाद्या इव्हेंटमध्ये रॅम्पवॉक केला. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सरोज जालान यांच्या शोची जेनेलिया शो स्टॉपर ठरली. या रॅम्पवॉकमध्ये जेनेलियाने लाल रंगाचा लेहंगा घातला होता. त्यावर जरीचे वर्क करण्यात आले होते. त्यासोबतच तिने मेटॅलिक नेकपिस आणि कानातलेही घातले होते. या ग्रँड फिनालेमध्ये जेनेलिया डिसूजा, कंगना रनोट, शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, करिना कपूर, सोहा अली खान, नेहा शर्मा, उर्वशी रौतेला यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...