आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: हेलन का करणार होत्या आत्महत्या, कशा बनल्या त्या सलमानची सावत्र आई, वाचा रंजक स्टोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये आयटम नंबरसाठी ओळखल्या जाणा-या प्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत. हेलन यांनी त्यांच्या करियरची सुरुवात 'हावडा ब्रिज' या चित्रपटातून केली होती. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त फिल्म केल्या आहे. इमान धरम, डॉन, दोस्ताना, शोले या चित्रपटांमधील त्यांच्यावर चित्रीत झालेले आयटम नंबर आजही लोकप्रिय आहेत. हेलन या सलमान खानच्या सावत्र आई असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. 1981 मध्ये सलीम खान यांनी हेलन यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. पण सलीम खान विवाहित आणि चार मुलांचे वडील असूनदेखील त्यांनी हेलन यांच्यासोबत दुसरे लग्न का केले, याविषयी ब-याच जणांना ठाऊक नसावे.


चला तर मग जाणून घेऊयात, हेलन सलमानच्या सावत्र आई कशा झाल्या, यामागची संपूर्ण कहाणी....


अभिनेता सलमान खानच्या कुटुंबाचे प्रमुख सलीम खान आहेत. सलमान खानचे आजोबा अफगानिस्तानमध्ये राहात होते. तेथून ते भारतात आले आणि मध्यप्रदेशात सेटल झाले. सलमान खानने एकदा म्हटले होते, की तो अर्धा हिंदू आणि अर्धा मुस्लिम आहे. सलीम खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर आहेत. त्यांनी शोले, जंजीर, त्रिशुल यांसह अनेक गाजलेल्या सिनेमांची पटकथा जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून लिहिली. इंडस्ट्रीमध्ये त्यांचा आदर केला जातो. सलीम खान आता पटकथा लिहित नाही, आजारपणामुळे त्यांनी आता काम बंद केले आहे.

 

सलीम खान यांनी 1964 मध्ये सलमा खानबरोबर लग्न केले. त्यांना एकुण पाच अपत्य आहेत. त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाचा म्हणजे सलमान खानचा जन्म 1965 मध्ये झाला होता. त्यानंतर 1967 मध्ये अरबाजचा जन्म झाला. सोहेल खानचा जन्म 1970 मध्ये झाला. अलविरा या तिघांची सर्वात लहान बहीण आहे. तर अर्पिताला खान कुटुंबीयांनी दत्तक घेतले आहे. अभिनेत्री हेलन यांच्यासोबत दुसरे लग्न झाल्यानंतर अर्पिताची खान कुटुंबात एन्ट्री झाली.


पुढील स्लाईड्सवर वाचा, हेलन यांच्याविषयी सर्वकाही..


 

बातम्या आणखी आहेत...