आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकले का? हुमा कुरैशीची थट्टा करणे शोच्या होस्टला पडले भारी, रागात शूटिंग सोडून निघून गेली हुमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या रिअॅलिटी शोच्या सेटवर होस्ट शांतनू माहेश्वरी नेहमीच हुमा कुरैशीसोबत फ्लर्ट करताना दिसत असतो. मात्र अलीकडच्या एपिसोडमध्ये हुमा त्याच्या बोलण्याने चांगलीच नाराज झाली. शांतनू म्हणाला, 'मी एक थी डायन 50 वेळा बघितला कारण तुम्ही त्यात होत्या. तुम्ही चित्रपटात फारत सुंदर दिसल्या. नंतर तो पुढे म्हणाला, मात्र तुम्ही चित्रपटात ख-या डायनसारख्या दिसत होत्या.' 


रागात सेटवरुन निघून गेली हुमा... 
कायम शांतनूच्या जोक्सवर हसणारी हुमा यावेळी मात्र चांगलीच रागावली. शांतनूने तिची खिल्ली उडवताच हुमा नाराज झाली आणि उठून क्रिएटिव्ह टीमला जाऊन म्हणाली, मला अशा प्रकारच्या शब्दांची अपेक्षा नव्हती. यानंतर विवेक ओबरॉय शांतनूला म्हणाला की, तू अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करायला नको होता. त्याला हुमाची माफीसुद्धा मागायला लावली. 

 

या घटनेने शांतनूची उडाली घाबरगुंडी...
या घटनेमुळे शांतनू खूपच घाबरला होता. नेमके काय करावे, हे त्याला समजत नव्हते. मात्र नंतर त्याला कळले की, हुमा, ओमंग कुमार आणि विवेक त्याची फिरकी घेत होते. फिरकी घेत असल्याचे कळल्यानंतरसुद्धा शांतनूच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...