आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही डेस्क : या नवरात्रीमध्ये इशिता गांगुली हिचे कालीमातेचे रूप एक मायथॉलॉजिकल शो 'जय मां वैष्णो देवी' मध्ये दिसणार आहे. इशिताला पूर्णपणे काली मातेच्या रूपात तयार होण्यासाठी जवळपास 4 ते 5 तास लागायचे. आपल्या या लुकबद्दल इशिता खूप उत्सुक आहे.
4-5 तासांत पूर्ण व्हायचा मेकअप...
दैनिक भास्करसोबत बोलताना इशिता गांगुली म्हणाली, "काली मातेचे रूप घेणे खूपच अवघड होते. पूर्ण शरीर काळे केले जायचे आणि वजनदार नर मुण्डमाळ, मुकुट हे सर्व घालून जेव्हा तयार व्हायचे. तेव्हा कधी कधी माझेमलाच रडू कोसळायचे. या रूपात येण्यासाठी जवळपास 4 ते 5 तास लागायचे. हा गेटअप माझ्यासाठी खूपच विशेष आहे. कारण मी काली मातेची खूप मोठी भक्त आहे."
या शोजमध्येदेखील दिसली आहे...
इशिताच्या आईला तिचा हा काली मातेचा लुक खूप आवडला आणि विशेषतः तिचे कोलकात्यातील नातेवाईक खूप उत्सुक आहेत तिला या लूकमध्ये शोमध्ये पाहण्यासाठी. इशिताने 'शास्त्री सिस्टर्स', 'इश्क़ का रंग सफ़ेद', 'लाल इश्क़' यांसारख्या अनेक शोजमध्ये काम केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.