Home | Gossip | actress Jenifer vinget shared her bikini photo, users trolling her

टीव्हीच्या संस्कारी सुनेला टू पीस बिकिनीमध्ये पाहून आपापसांत भिडले सोशल मीडिया यूजर्स, एकजण म्हणाला - 'काय गरज आहे तुला हे सर्व करायची', दूसरा म्हणाला - 'जर तुम्ही कुणाला अप्रिशिएट करू शकत नाही तर कमेंटही करू नका' 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 16, 2019, 12:12 PM IST

बिपाशा बासूच्या पतीची एक्स वाइफ आहे अभिनेत्री, 2 वर्षांतच मोडला होता संसार... 

 • actress Jenifer vinget shared her bikini photo, users trolling her

  एंटरटेनमेंट डेस्क : 33 वर्षांची टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट सध्या कोणत्याच शोमध्ये दिसत नाही. ती सध्या ब्रेक मोडमध्ये आहे आणि सुट्ट्या एन्जॉय करत आहे. याचदरम्यान तिने काही फोटोशूट्स करून घेतले आहेत. जेनिफरने आपल्या इंस्टाग्रामवर एक टू पीस बिकिनीमध्ये फोटो शेयर केला आहे. या फोटोवर तिने कॅप्शन लिहिले, 'new insta story🌻Uff Damn hot!! While my eyes see how beautiful you look outside. My heart feels how perfect you are inside.🥀❣️.' जेनिफरचा फोटो पाहून यूजर्स आपापसात भिडले आहेत आणि कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले, 'काय गरज आहे तुला हे सर्व करायची' तर त्यावर दुसर्याने उत्तर दिले, 'जर तुम्ही कुणाला अप्रिशिएट करू शकत नाही तर कमेंटही करू नका.'

  याचप्रकारे इतर यूजर्सनेही कमेंट केले...
  - एका यूजरने कमेंट करत लिहिले, 'तुला हे सर्व करणे शोभत नाही.' एकाने लिहिले, 'लाज वाटायला पाहिजे तुला.' एकाने लिहिले, 'मला हा फोटो अजिबात आवडला नाही.' एक म्हणाला, 'मला तू या ड्रेसमध्ये कधीच आवडू शकत नाही.'

  - काही यूजर्स जेनिफरच्या बचावासाठीही समोर आले. एकाने कमेंट करून लिहिले, 'जर मेल अॅक्टर आपले हाफ नेक्ड फोटो शेयर करू शकतात तर अॅक्ट्रेस बिकिनीमध्ये फोटो का शेयर करू शकत नाही.' आणखी एका यूजरने लिहिले, 'जे जेनिफरला सल्ला देत आहेत त्यांनी आपला सल्ला आपल्या जवळच ठेवावा.' एकाने लिहिले, 'जेनिफरची फिगर खूप हॉट दिसत आहे.'

  बिपाशाच्या पतीची एक्स वाइफ आहे जेनिफर...
  जेनिफर, बिपाशा बासूचा पती करण सिंह ग्रोवरची एक्स वाइफ आहे. दोघांनी 'कसौटी जिंदगी की' सीरियलमध्ये एकत्र काम केले होते आणि येथूनच त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. दोघांनी एप्रिल 2012 मध्ये लग्न केले होते. पण दोघांचेही लग्न जास्त दिवस टिकू शकले नाही. करणचा अग्रेसिव आणि फ्लर्ट वागणुकीमुळे दोघांमध्ये वाद होऊ लागले. शेवटी दोघांनी 2014 मध्ये घटस्फोट घेतला होता. जेनिफरपासून घटस्फोट घेतल्यानंतर करणने बिपाशासोबत लग्न केले. जेनिफरसोबत लग्न करण्याअगोदर करणने टीव्ही अॅक्ट्रेस श्रद्धा निगमसोबत लग्न केले होते.

  12 वर्षांच्या वयात सुरु केले होते करियर...
  जेनिफरने फिल्म 'राजा को रानी से प्यार हो गया' फिल्ममधून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. याव्यतिरिक्त तिने 'कुछ ना कहो', 'राजा की आएगा बरात', 'फिर से' अशा फिल्ममधेही काम केले आहे. तिने 'कुसुम', 'कोई दिल में है', 'कसौटी जिंदगी की', 'क्या होगा निम्मो का', 'कहीं तो है', 'दिल मिल गए', 'सरस्वतीचंद्र', 'बेहद', 'बेपनाह' सारख्या टीव्ही सीरियलमध्येही काम केले होते.

Trending