Home | TV Guide | actress juhi parmar dances with her daughter

6 वर्षांच्या मुलीच्या आनंदासाठी नाचली टीव्हीची 'कुमकुम', शाळेच्या टॅलेंट हंट शोमध्ये समायरासोबत 'जोगाड़ा तारा..' गाण्यावर केला जबरदस्त डान्स : Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 18, 2019, 10:38 AM IST

नवऱ्याशी घटस्फोटानंतर मुलीला एकटीच सांभाळत आहे जूही परमार... 

 • actress juhi parmar dances with her daughter

  एंटरटेन्मेंट डेस्क : टीव्हीवर 'कुमकुम' या नावाने प्रसिद्ध असलेली जूही परमार हिने 6 वर्षांची मुलगी समायराच्या आनंदासाठी डान्स परफॉर्मन्स दिला. समायराच्या शाळेमध्ये टॅलेंट हंट शो झाला होता. यामध्ये जूही आणि समायराने 'जोगाड़ा तारा...' या गाण्यावर डांन्स केला. आई आणि मुलानेच हा डान्स परफॉर्मन्स पाहून ऑडियंसने खूप टाळ्या वाजवल्या. जूहीने हा डान्स व्हिडीओ इंस्टाग्रामवरही शेयर केला आहे.

  या व्हिडीओवर जुहीने मॅसेज लिहिला आहे...
  जूहीने व्हिडीओ शेयर करू त्याला कॅप्शन दिले, 'फॅमिली जी सोबत डान्स करते आणि सोबत राहते. समायराच्या शाळेमध्ये टॅलेंट हंट शो झाला, ज्यामध्ये मी मुलीसोबत डान्स केला आहे. हि पहिलीच वेळ होती जेव्हा मी माझ्या मुलीसोबत परफॉर्मेंस दिला आहे. ऑडियंसने आमच्यासाठी खूप टाळ्या वाजवल्या. मला स्वतःवर खूप प्राउड फील होत होते जेव्हा कितीतरी लिकांनी मला सांगितले की, समायराच्या डान्स वरून आमची नजर हटत नव्हती.'

  लग्नाच्या 9 वर्षांनंतर झाला जूही-सचिनचा घटस्फोट...
  जूही आणि सचिनने 2009 मध्ये लग्न केले होते. लगाच्या दोन वर्षांनंतरच दोघांचेही नाते बिघडू लागले. दोघांमध्ये भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या. 2011 मध्ये कपलमध्ये झालेल्या भांडणाची चर्चा संपूर्ण मीडियात पसरली होती, मात्र मुलगी समाइराच्या जन्मानंतर सर्वकाही ठीक झाले होते.

  - त्यावेळी त्यांचे नाते काही दिवस ठीक राहिले पण नंतर पुन्हा नात्यातील तणाव वाढत गेला. सचिननुसार, जूही शॉर्ट टेंपर आहे आणि तो मात्र याच्या एकदम विरुद्ध आहे. जूहीच्या अशा वर्तनामुळेच प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झाली. तसेच जूहीने सांगितले की, सचिन खूप लवकर गोष्टी विसरतो. यामुळेच हळू हळू भांडण वाढले.

  - जूहीने पतीकडून 2018 मध्ये घटस्फोट घेतला. दोघांनी एकमेकांच्या सहमतीनेच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. रिपोर्ट्सनुसार, जूहीने पती सचिनकडून कोणतीच पोटगी मागितली नाही. मुलगी समायराची कस्टडी जूहीला मिळाली आहे. मात्र, सचिन भेटण्यासाठी येत असतो.

Trending