आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अभिनेत्री काजोल आता रायटर बनली आहे. तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा बायोग्राफी 'श्रीदेवी : द इंटरनल स्क्रीन गॉडेस' ची प्रस्तावना लिहिली आहे, ज्यामध्ये त्यांच्या आयुष्याशी निगडित काही इनपुट वाचायला मिळणार आहे. या बुकबद्दल बोलत काजोल एका स्टेटमेंटमध्ये म्हणाली होती, "मी चित्रपटाच्या सेटवर श्रीदेवी यांचे स्टारडम आणि मोठ्या पडद्यावरचे त्यांचे काम पाहात पाहात मोठी झाले. त्या स्वतःमध्येच एक इंस्टीट्यूशन होत्या आणि नेहमी माझ्या फेव्हरेट राहतील. मी खूप खुश आहे की, या पुस्तकाची भूमिका लिहिण्याची संधी दिली गेली."
काजोल परफेक्ट चॉईस : ऑथर सत्यार्थ नायक...
पुस्तकाचे लेखक सत्यार्थ नायक आहेत. त्यांच्यानुसार, प्रस्तावननेच्या लेखनासाठी काजोल एकदम परफेक्ट चॉईस आहे. नायक म्हणाले, "काजोल इंडस्ट्रीशी जोडलेली आहे आणि तिने 80-90 च्या दशकामध्ये श्रीदेवी यांची लोकप्रियता पाहिली आहे. एक उत्तम अभिनेत्री म्हणून ती अनेक वर्षांपासून श्रीदेवी यांचे अनुसरणदेखील करत आहे. हे सर्व तिच्या प्रस्तावनेत दिसते आहे. ती त्या अभिनेत्रींच्या एका पिढीचे प्रतीक आहे, ज्या श्रीदेवी यांच्या कामाने प्रेरित होत्या."
बोनी कपूर यांनी दिली आहे बायोग्राफीला परवानगी...
श्रीदेवी यांचे पती प्रोड्यूसर बोनी कपूर यांनी बायोग्राफीला परवानगी दिली आहे. 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईच्या एका हॉटेलच्या बाथटबमध्ये दुर्घटनावश बुडाल्याने श्रीदेवी यांचे निधन झाले होते. त्यांचा शेवटचा चित्रपट 'झिरो' त्यांच्या निधनानंतर रिलीज झाला होता. मात्र यामध्ये त्यांचा केवळ कॅमियो होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.