आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Kajol Not Going To Farm House For New Year's Welcome, She Is Busy In Planning The Promotion Of 'Tanaji' Movie.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फार्म हाऊसवर जाणार नाही अभिनेत्री काजोल, 'तानाजी' चित्रपटाच्या प्रमोशनच्या प्लॅनिंगमध्ये आहे व्यस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : दरवर्षी काजोल नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तिच्या फाॅर्म हाउसवर जायची. तेथे कुटुंबियांसोबत नवीन वर्ष उत्साहात साजरा करायची, परंतु यावर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ती फॉर्म हाउसवर जाऊ शकणार नाही. काजोलला यंदाचे नवीन वर्षाचे काय प्लॉनिंग आहे? असे विचारले असता ती म्हणाली.., 'काही खास प्लॅनिंग नाही, कारण 'तानाजी' प्रदर्शित हाेणार आहे. बस, आम्ही सर्व याच्याच प्रमोशनची प्लानिंग करतोय, कधी इंटरव्यू द्यायचे आहेत, कुठे आणि कधी प्रमोशन करण्यासाठी जायचे आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आम्ही आमच्या फॉर्म हाउसवर जात असतो. तेथे आमचे संपूर्ण कुटुंब असते. आम्ही सर्वजण एकत्र बसून मजा करतो, परंतु यावेळी मी जाऊ शकणार नाही, कारण यावेळी तर प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.

देशात सध्या होत असलेल्या घडामोडींबाबत काजोलला विचारले..., देशात जे काही घडतय ते पाहून तुला दु:ख होत असेल ना? त्यावर ती म्हणाली, 'खूप वाईट वाटतंय..., हे सर्व आपल्या देशात होत आहे, परंतु मला असे वाटते की, असे फक्त आपल्याच देशातच घडत नाही तर प्रत्येक देशात काही ना काही सुरूच असते. अमेरिकेच्या राष्ट्रपतींबाबत काही होत असल्याची चर्चा आहे. नंतर फ्रान्समध्ये काहीतरी सुरू आहे. असे प्रत्येक देशात काही ना काही सुरू असतेच. आंतरराष्ट्रीय इश्यू आहेत. आपली माणुसकी कुठे ना कुठे कमी होत चालली आहे, असे मला वाटत आहे. मात्र लवकरच सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वासही आहे.
 

बातम्या आणखी आहेत...