आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क - सब टीव्ही चॅनलवरील 'FIR' मालिकेतील 'चंद्रमुखी चौटाला' नावाने प्रसिध्द असलेली अभिनेत्री कविता कौशिकचे काही फोटोज समोर आले आहेत. यात ती बिकिनीमध्ये पती रोनित विश्वास सोबत योगा आणि व्यायाम करताना दिसत आहे. यावेळी तिला हॉट योगा करताना दोन वेळेस प्रयत्न करुनही संतुलन राखता आले नाही. कविताने याचे काही फोटो आणि व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या जोडप्याला पाहून सोशल मिडीया युझर्सनी 'ट्राय अगेन' अशा प्रतिक्रिया देत त्यांना प्रोत्साहन दिले.
मुस्लीम प्रियकरासोबत करायचे होते लग्न
कविता कौशिकला तिचा प्रियकर नवाब शाह सोबत लग्न करण्याची इच्छा होती. परंतू कविताच्या वडिलांना हे नाते मान्य नव्हते. कविताचे वडील आपल्या मुलीचे लग्न एका मुस्लिम मुलासोबत करायला तयार नव्हते. कविता तिच्या आई-वडिलांवर खुप प्रेम करते आणि त्यांच्या विरोधात जाऊन तिला लग्न करायचे नव्हते. कविता नवाब शाह पेक्षा 9 वर्षांनी लहान आहे.
अचानक जुन्या मित्रासोबत केले लग्न
कविता 27 जानेवारी, 2017 रोजी केदारनाथ येथील शिव पार्वती मंदिरात तिचा जवळचा मित्र रोनित विश्वाससोबत विवाहबद्ध झाली. या लग्नात दोन्ही परिवारातील सदस्य आणि काही मित्रांचा समावेश होता. कविताने आपल्या मित्रांना संदेश पाठवून लग्नाबद्दल सांगितले. या संदेशात 'मी 27 जानेवारीला माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत लग्न करुन नव्या आयुष्याची सुरूवात करत आहे. हा अचानक घेतलेला निर्णय आहे. तुम्ही याला नशीबही म्हणू शकता, पण मी प्रेग्नेंट नाही. आम्ही केदारनाथ येथील शिव पार्वती मंदिरात लग्न करणार आहोत, असे लिहले आहे.
'F.I.R' मुळे मिळाली प्रसिध्दी
कविताने अनेक टि.व्ही. मालिकांमध्ये काम केले आहे पण सब टि.व्ही वरील 'एफआयआर' या शो मुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने एका हरियाणवी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. 2013 मध्ये तिने ही मालिका सोडली होती, पण प्रेक्षकांच्या आग्रहास्तव तिने परत एकदा या शोमध्ये पुनरागमन केले.
बॉलीवुडमध्ये एंट्री
अनेक मालिकांत काम केलेल्या कविताने काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. एक हसीना थी, मुंबई कटींग, फिल्म सिटी आणि जंजीर अशा काही चित्रपटांत ती झळकली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.