आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने घेतली गरजवंत मुलांची भेट, स्वत: तयार केलेल्या वस्तू मुलांना भेट दिल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने नुकतीच एका सामाजिक संस्थेसोबत मिळून गरीब आणि गरजू मुलांची भेट घेत चर्चा केली. काही दिवसांपूर्वीच ती 'सिग्नल स्कूल- अ गोल्डन रे ऑफ होप' नावाच्या संस्थेतही गेली होती. या शाळेची स्थापना समर्थ भारत व्यासपीठाने ठाणे महापालिकेसोबत मिळून ठाणे येथील सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसाठी केली होती. कीर्तीने या मुलांसोबत वेळ घालवला. तिने स्वत: तयार केलेल्या वस्तू मुलांना भेट दिल्या.

'रोटी घर'च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आलेल्या कीर्तीने येथील मुलांची भेट घेतली. ही संस्था एका दिवसात १००० गरजू मुलांना मोफत जेऊ घालते. आपला हा अनुभव शेअर करत कीर्ती म्हणाली- 'आपल्या समाजामध्ये होत असलेल्या चांगल्या कामांमध्ये सहभागी होण्याची खूप इच्छा असते, पण तेवढा वेळ मिळत नाही. 'सिग्नल स्कूल' आणि 'रोटी घर' दोन्हीही चांगले काम करत आहेत. या संस्था मुलांचे पालन-पोषण करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. मी या लोकांचे समर्थन करते, जेणेकरून ते समाजामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतील. तुम्ही कोण आहात आणि किती योगदान देऊ शकता, हे इथे महत्त्वाचे नाही. मात्र, प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. याचे परिणाम दूरगामी असतात.'