आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये झाली शनयाच्या एफ.जी.पी. ची एंट्री, खरंच ती राधिकाचं काही वाकडं करू शकेल का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास २ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. 


अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी बघितलं की, शनाया आणि राधिकाच्या हातमिळवणीची खबर गुरूला लागल्यामुळे त्यांची युती तुटली. आता शनायाला गुरु आणि राधिका दोन्हीकडून आर्थिक आधार नाहीये. त्यामुळे ती आधीपासून तिला मार्गदर्शन करणाऱ्या एफ.जी.पी.ला तातडीने इकडे बोलवून घेते. सगळ्यांना सुरुवातीपासूनच हा किंवा ही एफ.जी.पी. कोण आहे याची उत्सुकता लागली होती, पण ही एफ.जी.पी दुसरी तिसरी कोणी नसून शनायाची आई आहे आणि ती भूमिका अभिनेत्री किशोरी आंबिये निभावत आहे. नुकतीच मालिकेत एफ.जी.पी ची एंट्री झाली आहे आणि आता ही एफ.जी.पी शनायासारखीच राधिकाची वाट लावायच्या उद्देशाने आली आहे. पण ती राधिकाचं काही वाकडं करू शकेल का? हे पाहणं जास्त रंजक ठरेल.

 

बातम्या आणखी आहेत...