Home | Gossip | actress mahika sharma Keeping Navratri Fast for Rahul Gandhi Victory

राहुल गांधीच्या विजयासाठी ही अभिनेत्री करते आहे उपवास, म्हणाली - 'मी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्रत करत आहे आणि ते केवळ राहुल गांधी यांच्याच हातात आहे'

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 13, 2019, 02:33 PM IST

अभिनंदन भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीने बिकिनी फोटो शेयर करून केले होते स्वागत... 

 • actress mahika sharma Keeping Navratri Fast for Rahul Gandhi Victory

  मुंबई : टीव्ही सीरिज 'रामायण' (2012) आणि 'एफआयआर' मध्ये काम केलेली अभिनेत्री महिका शर्मा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. निवडणुकीच्या काळात महिका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे खूप चेचेत आहे. महिकाचे म्हणणे आहे की, चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गाला खुश करण्यासाठी ती व्रत करत आहे. एवढेच नाही, तिची इच्छा आहे की, यावर्षी लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधीच जिंकावे.’

  महिकाचा उपवास पूर्ण नऊ दिवसांचा आहे...
  लोकसभा निवडणुकीतील पहिला टप्पा 11 एप्रिलला पूर्ण झाला आहे. याचदरम्यान महिकाने सांगितले, ''मी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्रत करत आहे आणि ते केवळ राहुल गांधी यांच्याच हातात आहे. मला महित आहे की, माता रानीच्या कृपेने त्यांचा नक्कीच विजय होईल. सनातनी धर्मात पत्नी आपल्या पतीची मनोकामना आणि विजयासाठी व्रत करते. राहुल गांधीने यांनी अद्याप लग्न केले आंही आणि ते आपले आयुष्य देशाच्या सेवेसाठी घालवत आहेत, त्यामुळे माझी जबाबदारी आहे की, मी त्यांच्यासाठी काहीतरी करावे.''

  विंग कमांडर अभिनंदन परातल्यानंतर हे बोलली होती महिका...
  काही दिवसांपूर्वी विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानहुन भारतात परतले तेव्हा महिकाने सोशल मीडियावर एक बिकिनी फोटो पोस्ट करून त्यांचे स्वागत केले होते. महिका म्हणाली होती की, अभिनंदनसोबत तर देशातील कोणत्याही मुलीला लग्न करावेसे वाटेल. एवढेच नाही, महिकाने विंग कमांडरचा फोटो शेयर करून लिहिले होते, ''सलमान, शाहरुख आणि आमिरला विसर, आपला खरा हीरो भारतात परतला आहे. मला त्यांना लवकरात लवकर भेटायचे आहे.''

  शाहिद आफरीदीबद्दलही केले होते वादग्रस्त वक्तव्य...
  महिकाने जून, 2018 मध्ये दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफरीदीसोबत रिलेशन बनवण्यासाठीचे आपले वेड व्यक्त केले होते. महिका म्हणाली होती, ''मला शाहिद तेव्हापासून आवडतो, जेव्हा तो 13 वर्षांचा होता. मी त्याचा फोटो समोर ठेऊन त्याला Kiss करायचे. महिकाने एवढ्यावरच संपवले नाही तर ती म्हणाली, 'शाहिदसाठीचे माझे वेड इतके वाढले आहे की, त्यांच्यासोबत सेक्स करायलाही तयार आहे.' ती म्हणाली, मी त्या दिवसाची वाट पाहत आहे, ज्या दिवशी शाहिद मला 'हॅलो' म्हणेल.'' यापूर्वीही महिकाने ब्रिटिश पॉर्न स्टार डॅनी डीसोबत संबंध बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

  या टीव्ही सीरिजमध्ये काम केले आहे महिकाने...
  26 जुलै 1994 ला हरियाणामध्ये जन्मलेली महिका 'द सूट लाइफ ऑफ करन एंड कबीर', 'पोलीस फॅक्टरी' आणि 'तू मेरे अगल बगल है' अशा टीव्ही सीरिजमध्ये काम केले आहे. महिकाने 2012 ची टीव्ही सीरिज 'रामायण' मध्ये देवी अम्बाचा रोल प्ले केला होता.

Trending