आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Manushi Chillar Says 'trying To Learn The Small But Impotent Things About Acting'

अभिनेत्री मानुषी छिल्लर म्हणाली, 'अभिनयाचे बारकावे शिकण्याचा मनापासून प्रयत्न करत आहे'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पृथ्वीराज' या चित्रपटाद्वारे मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर पदार्पण करत आहे. हा चित्रपट मिळाल्यामुळे ती खूप खुश आहे. या चित्रपटात ती संयोगिताच्या भूमिकेत आहे. आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगचा ती कसा आनंद घेत आहे, याविषयी तिने सांगितले, सध्या मी शिकण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेत आहे, कारण माझ्याकडे शिकण्यासाठी मैदान खुले आहे. अभिनेत्री होण्यासाठी शिकण्याची प्रक्रिया हा सर्वात चांगला टप्पा आहे. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कठोर परिश्रम करणे, कारण यशराज फिल्म्सने माझ्यावर खूप विश्वास दाखवला आहे. नवीन वर्षात मला त्यांनी चित्रपटाची आॅफर दिली. ही माझ्या नवीन वर्षाची, नव्या करिअरची सुरुवात आहे. या सुवर्णसंधीने मी स्वत: ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करने. मानुषी पुढे म्हणाली, 'अक्षय कुमारच्या चित्रपटाचा भाग होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी त्यांच्याकडून बरेच काही शिकेन. मी कँडी स्टोअरमधील एका मुलासारखी आहे, कारण प्रत्येक सेकंदाला मी चित्रपट निर्मिती आणि अभिनयाच्या अनेक नवीन बाबींचा सामना करत असते. पहिल्या दिवसाचे शूटिंग संपल्यानंतर मी दुसऱ्या दिवसाच्या शूटिंगसाठी स्वत: ला तयार करत असते. पुन्हा सेटवर परत येण्याची उत्सुकता असते. 'पृथ्वीराज' हा माझा पहिला चित्रपट आहे आणि मला अभिनेत्री होण्याच्या प्रक्रियेचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे. शिवाय अभिनयाचे बारकावे शिकायचे आहेत, त्यामुळे या वेळेचा मी योग्य उपयोग करणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...