आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Mrinal Thakur, Confused Due To Shooting Schedule Of The Two Films, Said 'From Now I Will Take Only One Movie At A Time'

दोन चित्रपटांच्या शूटिंग शेड्यूलमुळे गोंधळली अभिनेत्री मृणाल ठाकूर, म्हणाली - 'यापुढे मी एकावेळी एकच चित्रपट हाती घेईन'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'लव्ह सोनिया', 'बाटला हाउस', 'सुपर ३०' इत्यादी चित्रपटात झळकलेली मृणााल ठाकूर सध्या दाेन चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. एक फरहान अख्तरसोबत 'तूफान' तर दुसरा शाहिद कपूर 'जर्सी'करत आहे. दोघांच्या शूटिंग शेड्यूलमध्ये थोडा फरक आहे. त्यामुळे दोघांचे शूटिंग अॅडजस्ट करण्यात तिला अडचण होत आहे. यामुळे ती गोंधळून गेली आहे.

याविषयी ती म्हणाली, मी सध्या 'जर्सी' आणि 'तूफान'वर फोकस करत आहे. दोघांची शूटिंग सोबत सुरू आहे. या लोकेशनवरून त्या लोकेशनवर जावे लागत आहे. मात्र यापुढे आता मी एकच चित्रपट हातात घेईन. तो पूर्ण झाल्यावरच दुसरा घेईन. 'तूफान'चे शूटिंग जवळजवळ ६० टक्के पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीमध्ये ते पूर्ण होईल. दुसरीकडे ३१ डिसेंबरपर्यंत शाहिदसोबत चंदिगडमध्ये 'जर्सी'ची शूटिंग सुरू आहे. शाहिदसोबत काम करून चांगले वाटत आहे. दोन्ही चित्रपटातील पात्राविषयी तिला विचारले असता मृणाल म्हणाली..., आपल्या पात्राविषयी जास्त सांगणार नाही. एवढेच की, 'जर्सी'चे तेलगू व्हर्जन तुम्ही पाहिले असेलच त्यात साराचे पात्र मी साकारणार आहे. 'तूफान'मध्ये फरहानच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे.