Home | Maharashtra | Mumbai | Actress Neelam and Govinda interesting Love Story

लग्नानंतरही नीलमला विसरु शकला नव्हता गोविंदा, सुनीतासोबत दबावात लग्न केल्यानंतर नेहमी व्हायचे भांडण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 01:13 PM IST

नीलमच्या प्रेमात असलेल्या गोविंदाने सुनीतासोबतचा साखरपुडा मोडण्याचा केला होता प्रयत्न

 • Actress Neelam and Govinda interesting Love Story

  मुंबई - 90's ची प्रसिध्द अभिनेत्री नीलम 50 वर्षांची झाली आहे. 9 नोव्हेंबर, 1968 मध्ये हाँगकाँगमध्ये तिचा जन्म झाला. तिचे आणि गोविंदाचे अफेअर दिर्घकाळ चर्चेत होते. 1986 मध्ये आलेल्या 'लव्ह 86' मध्ये नीलमने गोविंदासोबत काम केले होते. पहिल्या चित्रपटात गोविंदाची हिरोईन असलेल्या नीलमवर गोविंदाचे जीवापाड प्रेम होते, असे म्हटले जाते. मात्र तो नीलमसोबत लग्न करु शकला नाही.

  वाढदिवसानिमीत्त गोविंदा आणि नीलमची पडद्या आडची लव्हस्टोरी
  गोविंदा आणि नीलम यांनी 80च्या दशकात बॉलिवूड करिअर सुरू केले होते. चित्रपटांत एकत्र काम करताना गोविंदाचे नीलमवर प्रेम जडले होते असे म्हणतात. एंटरटेनमेंट पोर्टल पिंकविलामधील एका रिपोर्टनुसार गोविंदाला नीलमबरोबर लग्न करायचे होते. पण गोविंदाच्या आईला त्याने डायरेक्टर आनंद सिंह यांची साली म्हणजे सुनिता ( गोविंदाची पत्नी) बरोबर लग्न करावे असे वाटत होते. आईचे म्हणणे गोविंदा कधीही टाळू शकत नव्हता, त्यामुळे त्याने नीलमऐवजी सुनिताशी लग्न केले. गोविंदाने कधीही नीलमवर असलेले त्याचे प्रेम व्यक्त केले नाही, किंवा ते कधी समोरही आले नाही.


  लग्नाची बातमी लपवली..
  गोविंदाने आईच्या सांगण्यावरून सुनिताबरोबर मार्च 1987 मध्ये लग्न केले. पण ही बातमी त्याने लपवून ठेवली होती. करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून त्याने लग्न झाल्याचे उघड केले नाही. पण गोविंदाची मुलगी टीनाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या लग्नाची बातमी समोर आली. पिंकविलामधील रिपोर्टनुसार 1990 मध्ये एका मुलाखतीत तो म्हणाल होता, लग्नानंतरही तो नीलमला कधी विसरू शकला नाही. त्याने नीलमबरोबर अनेक चित्रपट केले. नीलमने केवळ त्याच्याबरोबरच चित्रपट करावे असे त्याला वाटत होते.

  नीलमच्या सिम्पल लिव्हिंगवर फिदा होता गोविंदा
  'इल्जाम' (1986) गोविंदाचा पहिला चित्रपट होता. त्यात नीलम त्याची को-स्टार होती. गोविंदा जेव्हा पहिल्यांदा नीलमला भेटला तेव्हा तिचे सिम्पल लिव्हिंग त्याला आवडले होते.
  - नीलमची बॉलिवूड एंट्री गोविंदाच्या आधी झाली होती. तिचा पहिला चित्रपट 'जवानी' (1984) गोविंदाने अनेक वेळा पाहिला होता. नीलमला वारंवार पाहण्यासाठी त्याने असे केले होते. गोविंदा आणि नीलमने फिल्म 'लव 86' (1986), 'खुदगर्ज' (1987), 'सिंदूर' (1987), 'हत्या' (1988), 'घराना' (1989), 'दोस्त गरीबों का' (1989), 'दो कैदी' (1989), 'फर्ज की जंग' (1989), 'बिल्लू बादशाह' (1989), 'ताकतवर' (1989), 'जोरदार' (1996) मध्ये सोबत काम केले होते.

  पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या गोविंदा-नीलमबद्दल...

 • Actress Neelam and Govinda interesting Love Story
  नीलम आणि गोविंदा.

  गोविंदा-नीलमची पहिला भेट 
  प्राणलाल मेहताच्या ऑफिसमध्ये गोविंदाने नीलमला पहिल्यांदा पाहिले होते. त्याने इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, त्यावेळी नीलमने व्हाइट कलरचे शॉर्ट्स परिधान केले होते. तिचे लांब केस पाहून ती एखादी परी आहे असे वाटत होते. नीलमने हॅलो म्हणताच मला उत्तर द्यायलाही भिती वाटत होती. कारण माझी इंग्रजी चांगली नव्हती. मी तिच्याशी कसा बोलणार ही चिंता मला होती. पण हळू हळू आमच्यात मैत्री वाढत गेली. मी सेटवर तिला जोक सांगून खूप हसवायचो. आम्ही एकमेकांना भेटू लागलो आणि मला ती आवडायला लागली. कोणीही तिच्यावर प्रेम केल्याशिवाय राहू शकत नव्हते. 

  Govinda and Neelam untold love Story
  +7
   

 • Actress Neelam and Govinda interesting Love Story
  सुनीतासोबत लग्नात गोविंदा.

  पत्नी सुनीतासोबत गोविंदा.

   सुनिताशी नाते.. 
  गोविंदाला सुनिताबरोबर कधीही सिरियस रिलेशनशिप हवे नव्हते. तो शुटिंगमध्ये बिझी असायचा. एकदा गोविंदाचा मोठा भाऊ सेटवर आला. गोविंदा तेव्हा एक रोमँटिक सीन शूट करत होता. पण त्याला ते जमत नव्हते. त्यावेळी किर्ती गोविंदाला म्हणाला.'रोमान्सच्या एक्सपिरियन्ससाठी तू कोणाबरोबर तरी अफेयर करायला हवे. त्यामुळे तुझ्या लक्षात येईल की, तरुणीला मिठीत कसे घ्यायचे. भावाचा मुद्दा लक्षात घेत गोविंदा सुनिताला भेटला. हळू हळू तो सुनिताकडे झुकत गेला आणि पूर्णपणे तिला समर्पित झाला. 

  Govinda and Neelam untold love Story
  +5
   

 • Actress Neelam and Govinda interesting Love Story
  नीलम आणि गोविंदा.

  नीलम आणि गोविंदा.

  नीलमबाबत होता पझेसिव्ह 
  सुनिताबरोबर रिलेशनशिपमध्ये असूनही गोविंदा नीलमबाबत खूपच पझेसिव्ह होता. गोविंदा शुटिंगमध्ये बिझी राहत होता. त्यामुळे सुनिताच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यांच्यात छोट्या छोट्या मुद्द्यांवरून भांडण सुरू झाले. एकदा सुनिता नीलमबद्दल असे काही बोलली की गोविंदाने रागात साखरपुडाच मोडला होता. पाच दिवस दोघे एकमेकांशी बोलले नाही. गोविंदाने सुनिताशी लग्न करायचे नाही असे ठरवले होते. नीलम अधिक चांगली पार्टनर ठरेल असे गोविंदाला वाटत होते. 


   

 • Actress Neelam and Govinda interesting Love Story
  भाऊ किर्ती आणि आई निर्मलादेवींसोबत गोविंदा.

  आईचे म्हणणे टाळत नव्हता.. 

  गोविंदा, आई (निर्मला देवी) चे म्हणणे कधीही टाळत नव्हता. त्याच्या आईची इच्छा होती की, त्याने सुनिताशी लग्न करावे. आईचे म्हणणे ऐकत त्याने 1987 मध्ये सुनिताशी लग्न केले. पण त्याने लग्न झाल्याचे नीलमपासूनही लपवले होते. नीलमबरोबरची चित्रपटातील हिट जोडी त्याला तुटू द्यायची नव्हती. मात्र त्याला नंतर याचा पश्चाताप झाला.  

   

   

 • Actress Neelam and Govinda interesting Love Story
  जुही चावला आणि दिव्या भारतीसोबत गोविंदा.

  एकतर्फी प्रेम.. 
  गोविंदाचे नीलमवर खूप प्रेम होते. पण नीलमच्या मनात तसे काहीही नव्हते. गोविंदानेही कधी त्याचे प्रेम व्यक्त केले नाही. एवढेच नाही, गोविंदा जुही चावला आणि दिव्या भारतीकडेही आकर्षित झाला होता. गोविंदाने जुहीबरोबर 'स्वर्ग' (1990) 'कर्ज चुकाना है' (1991), 'भाभी' (1991) सह इतर चित्रपट केले. तर दिव्या भारतीबरोबर 'जान से प्यारा' (1992) आणि 'शोला और शबनम' (1992) हे चित्रपट केले. 


   

 • Actress Neelam and Govinda interesting Love Story
  गोविंदा आणि नीलम.

Trending