आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क: 'स्वामिनी' मालिकेची कथा, उत्तम कलाकार, सादरीकरण यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये मालिकेबद्दल पुढे काय होणार याची उत्सुकता आहे. मालिकेमध्ये अनेक दिग्गज आणि मातब्बर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत, गोपिकाबाईंची भूमिका ऐश्वर्या नारकर, काशीबाईंची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारत आहेत. आता लवकरच मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई यांची एंट्री होणार आहे. महाराणी ताराबाई यांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार आहेत. ताराबाईंच्या येण्याने कथेमध्ये कोणत्या महत्वपूर्ण घटना बघायला मिळतील याची उत्सुकता नक्कीच आपल्या सगळ्यांना आहे. सध्या माधवरावांच्या दुसर्या विवाहाची बोलणी करण्यासाठी गोपिकाबाईंनी रमाबाईंना गर्हाड्याला राहण्याचा आदेश दिला आहे. ताराबाईंच्या येण्याने रमा – माधवच्या नात्यात कोणते बदल होतील ? मालिकेमध्ये पुढे काय होईल ? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंनी रमा – माधवला दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांचे नाते हळूहळू अधिक घट्ट होत आहे. नानासाहेब आणि सदाशिवराव यांची खंबीर साथ, पार्वती बाईंची माया याची जोड आहेच. अनेक कट कारस्थान याबरोबरच शनिवार वाड्यामध्ये जानकीबाई आणि पेशविणबाई म्हणजेच गोपिकाबाई यांच्याकडे गोड बातमी आहे, त्यामुळे वाड्यातील सगळेच खुश आहेत. जानकीबाईंच्या बातमीमुळे खासकरून राघोबादादा खूप खुश आहेत. मालिकेमध्ये अनेक घटना घडत आहेत निजामचे चालून येणे, शिवाजीरावांवर जीवघेणा हल्ला होणे... तसेच मालिकेमध्ये लवकरच आनंदीबाईंची एंट्री होण्याची शक्यता आहे. त्यांची भूमिका कोण साकारेल ? त्यांच्या येण्याने पुढे काय घडेल ? हे लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.