आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणिती चोप्राला आहे मार्केटिंगचा अनुभव, भावाच्या बिझनेस सेटअपमध्ये करतेय मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: परिणीती चोप्रा सध्या आपल्या आगामी प्रोजक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबतच ती आपल्या कुटूंबासाठीही वेळ काढतेय. ती सध्या भाऊ सहज चोप्राच्या कुकीजच्या बिझनेस मार्केटिंगमध्ये मदत करतेय. 


सुत्रांनुसार, 'परिणीतीजवळ बिझनेस, फायनेंस आणि इकॉनॉमिक्समध्ये ट्रिपल ऑनर्स मास्टर्स डिग्री आहे. तिने मार्केटिंग फिल्ममध्येही काम केले आहे. ती यशराज स्टूडियोजमध्ये मार्केटिंगचे काम करायची. नंतर यशराजने तिला 2012 मध्ये 'इश्कजादे'मधून अर्जुन कपूरसोबत अॅक्ट्रेस म्हणून लॉन्च केले.'
तिच्या मार्केटिंग स्किल्सविषयी बोलायचे झाले तर परिणीतीला प्रमोशनल स्ट्रॅटेजीची माहिती आहे. ती भावाला प्रोडक्ट लॉन्चिंगमध्ये मदत करतेय. यासोबतच ती गाइड आणि सपोर्ट् म्हणूनही त्याच्यामागे उभी आहे. 

 

प्रमोशनल कँपेन केले शूट 
सहज लवकरच फ्रेंचाइजी होल्डर इंडियामध्ये जागतिक स्तरावर प्रसिध्द कुकीज ब्रँड घेऊन येणार आहे. हे प्रोडक्ट मीडिया आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिणिती आपल्या कडून शक्य तितके प्रयत्न करणार आहे. नुकतेच तिने आपल्या हेक्टिक शेड्यूलमधून दोन दिवस काढून या प्रोडक्टसाठी प्रमोशनल कँपेन शूट केले. तिचा भाऊ नक्कीच यश मिळवेल याविषयी परिणीती खुप कॉन्फिडेंट आहे.

बातम्या आणखी आहेत...