आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Payal Rohatgi Was Blocked By The Mumbai Police On Social Media, Said 'I Am Afraid To Live In India'

पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी केले ब्लॉक, अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्यक्त केला राग, म्हणाली - 'भारतात राहण्याची भीती वाटते'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आपल्या बेधडक आणि मुक्त वर्तनासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री पायल रोहतगी जवळपास प्रत्तेकाच विषयावर आपले विचार सोशल मीडियावर मांडते. पण अशातच तिच्या एका ट्वीटने सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. झाले असे की, मुंबई पोलिसांनी अभिनेत्री पायल रोहतगीला ट्विटरवर ब्लॉक केले आहे, त्यानंतर पायलने ट्विटरवर राग व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर फॅन्सदेखील पायलच्या सपोर्टमध्ये असल्याचे दिसते आहे. अभिनेत्री पायल रोहतगीने याची माहिती स्वतः ट्वीट करून दिली. तिने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, 'मुंबई पोलिसांनी मला का ब्लॉक केले...'

 

पायलने पुढे लिहिले, 'हिंदू असल्याच्या नात्याने आणि पोलिसांचे असे वर्तन पाहून भारतात राहण्याची भीती वाटते. मला आता कळाले की, का माझे कुटुंबीय मला हिंदूंसाठी बोलण्यापासून रोखतात.' पायल रोहतगीने आपल्या या ट्वीटसोबत मुंबई पोलिसांच्या अकाउंटचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे. पायल रोहतगीच्या या ट्वीटवर फॅन्स तिला सपोर्ट करताना दिसत आहेत. तिच्या एका फॅनने ट्वीटला रिट्वीट केले आणि मुंबई पोलिसांवर निशाणा साधत लिहिले, 'तुकडे तुकडे गॅंगचे पोलीस ऐकते पण राष्ट्रवादी पायल रोहतगीजीला मुंबई पोलीस ब्लॉक करतात का ???' या ट्वीटला पायलनेही रिट्वीट केले आहे.