आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्ट्रेस पायल रोहतगी म्हणाली - नेहरू-गांधी कुटुंबाच्या इतिहासामुळे काँग्रेस तीन तलाक कायदा पास होऊ देत नव्हते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - तलाक, तलाक, तलाक एवढं म्हटले आणि नाते संपले. पण आता या देशात ते शक्य होणार नाही. तसे करणाऱ्याला तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. केंद्र सरकारने बुधवारी तीन तलाक देणाऱ्यास गुन्हेगार ठरवणारा अध्यादेश जारी केला आणि राष्ट्रपतींनी त्याला मंजुरीही दिली. यावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. पण अॅक्ट्रेस पायल रोहतगीने तीन तलाकची प्रथा अद्याप बंद न होण्यासाठी काँग्रेसला जबाबदार ठरवले आहे. पायलने एका प्लेकार्डसह ट्वीट केले आहे. त्यात तिने काँग्रेसवर हल्लाबोल केला. मुस्लीम महिलांवर तीन तलाकमुळे कसा अत्याचार झाला हे तिने त्यातून सांगितले. 


यामुळे काँग्रेस पास होऊ देत नव्हती तीन तलाक विधेयक 
पायलने प्लेकार्डसह ट्वीट केले, नेहरू-गांधी फॅमिली ट्रीनुसार माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा यांचे पती फिरोज मुस्लिम किंवा पारसी होते. त्यामुळेच काँग्रेस तीन तलाक विधेयक पास होऊ देत नव्हती. तीन तलाक अध्यादेशावर त्यांची प्रतिक्रिया काय आहे. ते आनंदी आहेत की उदास आहेत.  

 

As per #NehruGandhi family tree, Mr. Feroze, the husband of Late Former PM Indira Ji, was a Muslim or Parsi so is that the reason @INCIndia was not letting the #TripleTalaqLaw pass till now🤔 What are their reactions to #TripleTalaqOrdinance 🙂 R they happy 😃 or sad 😔 pic.twitter.com/UjmqgxwnbX

— TEAM PAAYAL ROHATGI (@Payal_Rohatgi) September 19, 2018

प्लेकार्ड वरून मांडल्या महिलांच्या वेदना 
पायलने प्लेकार्डवर लिहिले, स्वातंत्र्यानंतर 70 वर्षे एखाद्या वस्तूप्रमाणे वागणूक देण्यात आली. न सांगता बदलण्यात आले. आता या अध्यादेशाने मुस्लीम महिलांना न्याय मिळाला आहे. 

#cowslaughter is NOT banned in #kerala. Dear Kerala people and politicians of Kerala, not good to hurt the sentiments of #Hindus. If u openly do that, sorry to sound but God also openly does it.. God is one ☝️ but u can’t hurt religious faith like this🙏 pic.twitter.com/eqBwM7F15G

— TEAM PAAYAL ROHATGI (@Payal_Rohatgi) August 27, 2018

केरळबाबतही केले होते वादग्रस्त कमेंट.. 
पायलने गोहत्या आणि केरळच्या पुराचा संबंध जोडत वादग्रस्त ट्वीटदेखिल केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...