आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोहब्बतें' फेम अॅक्ट्रेस प्रीतीच्या 7 वर्षांच्या मुलाला व्यक्तीकडून मारहाण, ऐश्वर्याच्या वहिणीलाही दिली धमका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

  

मुंबईः सुपरहिट फिल्म 'मोहब्बतें'द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री प्रीती झंगियानीचा सात वर्षांचा मुलगा जयवीरला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. प्रीती आणि तिचा पती प्रवीण डबास यांनी गुरुवारी यासंदर्भातील लिखित तक्रार पोलिसांना दिली आहे. या दोघांनी खास पोलिसांकडे आरिफ सिद्दीकी नावाच्या इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेचा उल्लेख प्रीतीने एका मुलाखतीत केला आहे.

 

प्रीतीने दिलेल्या माहितीनुसार, ''माझा मुलगा जयवीर खासस्थित शिवस्थान अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये त्याच्या काही मित्रांसोबत खेळत होता. तिथे दुस-या बिल्डिंगमधील काही मुलेदेखील होते. सर्व फुटबॉल खेळत होते. खेळता खेळात या मुलांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. तेथे खेळणा-या एका मुलाने माझ्या मुलाच्या पोटात जोरात मारले. त्यावर माझ्या मुलाने त्याला 'मुर्ख' म्हटले. यानंतर त्या मुलाने पुन्हा एकदा माझ्या मुलाला मारहाण केली. त्याने घरी जाऊन त्याच्या आईवडिलांकडे घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला. त्यानंतर त्या मुलाचे आजोबा आरिफ सिद्दीकी पार्कमध्ये आले आणि त्यांनी कुणाचे काहीही न ऐकता माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.''

 

ऐश्वर्या राय बच्चनच्या वहिणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, तिच्यावरही काढला राग...  
ही घटना घडली तेव्हा ऐश्वर्या राय बच्चनची वहिणी आणि फॅशन ब्लॉगर श्रिमा तिथे हजर होती, तिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्या व्यक्तीने तिलाही धमकावले आणि ''तू मध्ये पडू नकोस, आपल्या कामाशी काम ठेव,'' असे सुनावले. प्रीतीने सांगितले, लहान मुलांमध्ये लहानमोठी भांडणे होत असतात. पण मी आणि माझे पती कधीही त्यांच्यात बोलत नाही. ज्या व्यक्तीला महिलांशी बोलण्याची पद्धत नाही, त्याला धडा शिकवणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

प्रीती म्हणाली, घटनेनंतर मुलाने घाबरुन खाणे-पिणे सोडले..
प्रीतीने सांगितले की, माझ्या सात वर्षांचा मुलगा जीवे मारण्याची धमकी मिळाल्यापासून अतिशय घाबरलेला आहे. त्याने शाळेत जाणे बंद केले आहे आणि तो काही खातपीतदेखील नाही. आम्ही त्याची समजूत घालून त्याला आता शाळेत पाठवणे सुरु केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...