आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकलाकारासोबत जबरदस्त दांडिया खेळली अभिनेत्री प्रियांका चोप्रा, व्हिडिओ होत आहे व्हायरल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा सध्या आपला आगामी चित्रपट 'द स्काय इज पिंक' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी ती संपूर्ण देशात फिरत आहे. अशातच प्रियांका आपला सहकलाकार रोहित सराफसोबत अहमदाबाद होरी. येथे ती नवरात्रीच्या एका इव्हेंटमध्ये सामील झाली होती, जिथे तिने दांडिया केला. प्रियांकाचा दांडिया करतानाच व्हिडिओ समोर आला आहे. प्रियांका आणि रोहितचा डान्स करतानाचा व्हिडिओ खूपच वायरल होत आहे. यादरम्यान प्रियांका ब्लॅक कलरच्या शरारा ड्रेसमध्ये होती. सोबतच तिने बिंदीदेखील लावलेली होती. तसेच रोहितनेदेखील ब्लॅक पायजमा कुर्ता परिधान केला होता. यापूर्वी प्रियांका आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्येदेखील गेली होती.  

'द स्काय इज पिंक' चे दिग्दर्शन शोनाली बोसने केले आहे. या चित्रपटाचे टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियरदेखील ठेवले गेले होते. यादरम्यान प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर आणि शोनाली बोस यांच्यासह सर्व कलाकारदेखील पोहोचले होते. 'द स्काय इज पिंक' पाहिल्यानंतर प्रीमियरमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी चित्रपटाचे कौतुकही केले.