आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत सोडल्यानंतर प्रियांकाने सुरु केली 'द स्काय इज पिंक'ची शूटिंग, दिसणार फरहान अख्तरसोबत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर आणि जायरा वसीम स्टारर आगामी चित्रपट  'द स्काय इज पिंक'च्या पहिल्या शेड्यूलची शूटिंग मुंबईत सुरु झाली आहे. चित्रपटाची शूटिंग मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमानमध्ये होणार आहे. याचे डायलॉग्स राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखिका जूही चक्रवर्ती लिहिणार आहेत आणि म्यूझिक प्रीतम देतील. या चित्रपटाच्या माध्यमातून रॉनी स्कूवाला, सिध्दार्थ रॉय कपूर आणि प्रियांका चोप्रा सहाव्या वेळी एकत्र काम करणार आहेत. तिघांनी यापुर्वी ‘फॅशन’, ‘कमीने’ आणि ‘बर्फी’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात प्रियांका आणि फरहान, जायराच्या पालकांची भूमिका साकारतील. फरहान या चित्रपटाला को-प्रोड्यूसही करतोय.


दोन वर्षांपासून केला नाही बॉलिवूड चित्रपट 
गेल्या दोन वर्षांपासून प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये सक्रिय होती. तिने या दरम्यान 'क्वांटिको'व्यतिरिक्त तीन हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये बेवॉच','इजइंट इट रोमँटिक' आणि 'अ किड लाइक जेक' या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. हॉलिवूडमध्ये व्यस्त असल्यामुळे ती बॉलिवूडपासून दूर झाली होती. 2016 मध्ये आलेल्या 'गंगाजल'नंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. परंतू आता प्रियांका पुन्हा मुंबईत परतली आहे. 

 

सोडला सलमान खानचा 'भारत' 
प्रियांकाने शेवटच्या घडीला सलमान खानचा 'भारत' हा चित्रपट सोडला. यामुळे ती चर्चेत आली. 'भारत'चे दिग्दर्शक अली अब्बास जफरने शुक्रवारी 27 जुलैला एक ट्वीट करुन प्रियांकाने चित्रपट सोडल्याचे कन्फर्म केले होते. प्रियांका आणि निक जोनासचे लग्नाचे कारण यावेळी देण्यात आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...