आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : राणी मुखर्जीचा आगामी चित्रपट 'मर्दानी 2' चा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. ती या चित्रपटाने 5 वर्षांनंतर आईपीएस शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतत आहे. 2014 मध्ये या चित्रपटाचा पहिला पार्ट रिलीज झाला होता, ज्यामध्ये शिवानीची लढाई चाइल्ड ट्राफिकिंग आणि ड्रग्सविरुद्ध होती. हा चित्रपट प्रदीप सरकारने दिग्दर्शित केला आहे. 'मर्दानी 2' चे डायरेक्टर गोपी पुथ्रण आहे आणि यावेळी चित्रपटात शिवानी एका सीरियल रेपिस्टला पकडण्यासाठी संघर्ष करताना दिसणार आहे.
कोटा, राजस्थानची आहे कथा...
चित्रपटाची कथा राजस्थानच्या कोटा शहरातील आहे. जिथे देशभरातील लाखो मुले कोचिंगसाठी जातात. ट्रेलरची सुरुवात नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या रिपोर्टसोबत झाली आहे, ज्यानुसार, भारतात दरवर्षी 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले 2000 पेक्षा अधिक बलात्कार केले जातात आणि हा केवळ रजिस्टर्ड केसचा आकडा आहे. ट्रेलरमध्ये याचा दावा केला गेला आहे की, कथा सत्य घटनेवर आधारित आहे.
13 डिसेंबरला रिलीज होईल चित्रपट...
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट आदित्य चोप्राने प्रोड्यूस केला आहे. 'भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप' मध्ये अकबरच्या बालपणीचा रोल करणारा विशाल जेठवा यामध्ये व्हिलन दिसणार आहे. चित्रपटात राणी आणि विशाल व्यतिरिक्त विक्रम सिंह चौहान, श्रुती बापना आणि राजेश शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.