आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री ऋतुजा बागवेचा होतोय मराठी चित्रपटसृष्टीत डेब्यू, 'शहीद भाई कोतवाल'मध्ये झळकणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः नांदा सौख्य भरे या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे  नाटक आणि टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करतेय.  शहीद भाई कोतवाल या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार असून या चित्रपटात तिनं भाई कोतवालांच्या पत्नीची म्हणजेच इंदू कोतवालची भूमिका साकारली आहे. 

स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील, एकनाथ महादू देसले यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील भूमिकांमध्ये उत्तमोत्तम कलाकार दिसणार आहेत. त्यात ऋतुजाची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे. 

ऋतुजानं आतापर्यंत मालिका आणि नाटकांतून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. आता शहीद भाई कोतवाल सारख्या इतिहासावर आधारित चित्रपटातही ती आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवेल यात काहीच शंका नाही. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं प्रेक्षकांना फार वाट पहावी लागणार नाही.

बातम्या आणखी आहेत...