आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉट ओके झाल्यावर साधनाजी म्हणाल्या... हीरो घाबरला होता, पुन्हा चित्रीकरण करू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला साधनासारख्या अभिनेत्रीसेाबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला नशीबवान समजतो. आशा पारेख, माला सिन्हासारख्या दिग्गज अभिनेत्रींसोबत काम केल्यानंतर साधनासोबत काम करण्याची माझी मनस्वी इच्छा होती. मनापासून एखादी गोष्ट करण्याची इच्छा असली तर ती इच्छा खरच पूर्ण होते, असे काही माझ्यासोबत झाले. मला जेव्हा त्यांच्यासोबत ‘महफिल’ चित्रपट करण्याची ऑफर आली तेव्हा मी पटकन हाेकार दिला. साधनाजींसोबत काम करून मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची बरीच माहिती झाली. त्या शिस्तप्रिय व्यक्ती होत्या. त्या वेळेवर सेटवर यायच्या. चांगली अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक चांगली व्यक्तीदेखील होती.  त्यांच्यासोबत झालेला माझा पहिला शॉट मला आजही आठवतो..., मी नर्व्हस होतो. साधनाजी सेटवर आल्या होत्या आणि शॉट देण्यासाठी रेडी होत्या. मी बराच वेळ खोलीत बसून हाेतो. लवकर बाहेर आलो नाही तेव्हा कोणीतरी आवाज दिला... अरे, साधनाजी शॉटसाठी वाट पाहत आहेत.  मी हिंमत करून त्यांच्यासमोर गेलो. माझ्या पहिल्याच दृश्यात मला संवाद बोलून त्यांना मिठी मारायची होती. घाबरलेल्या अवस्थेतच मी तो शॉट पूर्ण केला. दिग्दर्शकांनीदेखील ओके केले. मात्र साधनाजी म्हणाल्या.., आम्ही पुन्हा एकदा हा शाॅट घेऊ. त्यानंतर त्यांनी मला शिकवले की,  मिठी कशी मारायची. त्या सेटवर नेहमी खुश राहायच्या. त्यांनी कधीच काही तक्रार केली नाही. इतकी मोठी अभिनेत्री असूनही त्या सर्वांसोबत मिळून-मिसळून राहायच्या. त्या सिंधी होत्या. घरून येताना सर्वांसाठी सिंधी जेवण घेऊन यायच्या. आम्हाला सर्वांना त्या टेबलवर बसून जेवू घालायच्या. त्यांच्या घरचे जेवण खूपच चविष्ट असायचे. त्यांच्या सुंदरतेविषयी तर माझ्याकडे शब्दच नाहीत. देवाच्या कृपेने त्यांच्याकडे एका अादर्श अभिनेत्रीचे सर्व गुण होते.  त्यांची युनिक हेअर स्टाइल त्यांची ओळख बनली होती. त्या काळात अनेक मुली साधना कट हेअर स्टाइलसाठी वेड्या झाल्या होत्या. चित्रपट प्रदर्शनानंतर त्यांना बऱ्याचदा भेटायला गेलो. एकदा मी त्यांच्या घरी गेलो होतो. मला नेहमीच त्यांच्या समोर भीती वाटायची. त्यांच्या घरी जात असतानाही मनात भीती होती, त्या काय म्हणतील. धाडस करून गेलो. मी गेल्याने त्यांना आनंद झाला. त्यांनी माझा चंागला आदरसत्कार केला. चांगले खाऊपिऊ घातले. सांगायचा अर्थ असा की, त्या खूपच शांत आणि साध्या स्वभावाची महिला होती.   साधनाजींच्या जीवनात शेवटच्या क्षणाला काही अडचणी आल्या.  इतर कलाकारांप्रमाणे त्यांना कधीच पैशाची चणचण जाणवली नाही. कारण त्यांनी चांगल्या प्रकारे पैसा गंुतवणूक करून ठेवला होता. मात्र त्यांच्या एका घराचा खटला सुरू असल्याचे एेकले हाेते. त्यांचे घर कार्टर रोडवर होते. तेथे आधी मीनाकुमारी राहत होत्या. म्हातारपणात त्यांना एकटे राहावे लागले.

बातम्या आणखी आहेत...