आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैयामी खेर जोडली गेली मुळाशी, रितेशच्या 'माऊली'मधून करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैयामी खेरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले , त्यानंतर सैयामी आता सज्ज झालिये रितेश देशमुख अभिनीत मराठी चित्रपट 'माउली'मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करायला..


'माऊली' या चित्रपटाच्या माध्यमातून सयामी पहिल्यांदा रितेशबरोबर स्क्रीन स्पेस शेयर करत असून, तिच्या भूमिकेसाठी परत मुळाशी जोडली गेली आहे. ब-याच जणांना हे ठाऊक नाही की, सैयामी मराठी अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे.सैयामीने  तिच्या आजीचे बरेच चित्रपट पहिलेत. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे अभिनेत्री तन्वी आझमी या सैयामीच्या आत्त्या आहेत आणि त्यांनी  रितेशसोबत मराठी चित्रपट "लय भारी" केला आहे. त्यामध्ये त्यांनी रितेशच्या आईची भूमिका वठवली होती.  

 

सैयामी म्हणते , "माझी आजी उषा किरण आणि त्यांच्या कामाची मी एक मोठी प्रशंसक आहे आणि त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला आवडले असते. मी त्यांचे चित्रपट पाहून बरेच काही शिकले आहे आणि मला आशा आहे की मी त्यांच्या नावाचा आदर राखेल.' 

बातम्या आणखी आहेत...