दुसऱ्यांदा आई होणार आहे 'रेस' ची अभिनेत्री, डोहाळे जेवणासाठी पोहोचले फॅमिली मेम्बर्स जवळचे फ्रेंड्स, आधी कापला केक मग सर्वानी केले खूप एन्जॉय

6 वर्षांपासून चित्रपटात नाही दिसली अभिनेत्री, आता बेघर मुलांसाठी करत आहे चांगले काम... 

दिव्य मराठी वेब टीम 

Apr 15,2019 03:08:00 PM IST

मुंबई : फिल्म 'रेस' मध्ये काम केलेली अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या आपल्या प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. समीरा लवकरच आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या जन्माआधी समीरा रेड्डीने आपली फॅमिली आणि मित्रांसोबत बेबी शॉवरची पार्टी केली. पार्टीमध्ये समीराचे पूर्ण घर सजवलेले दिसत आहे. यासोबतच समीराने केक कापून मित्रांसोबत पार्टी एन्जॉय केली.

अभिनयापासून दूर आता हे काम करत आहे समीरा...
समीरा रेड्डी खूप काळापासून अभिनयापासून दूर आहे. ती शेवटची 6 वर्षांपूर्वी 2013 मढेब आलेली कन्नड फिल्म 'वरदनायका' मी,मध्ये दिसली होती. त्यांनतर तिने 2014 मध्ये बिजनेसमॅन अक्षय वर्देसोबत लग्न केले. अक्षय मोटरसायकलचा बिजनेस करतो. समीराने 25 मे 2015 मध्ये मुलगा हंस याला जन्म दिला. सध्या समीरा 6 महिन्यांची प्रेग्नन्ट आहे. समीरा फिल्मपासून दूर राहिल्यानंतर समाज सेवेच्या क्षेत्रात सक्रिय झाली आहे. ती क्रयोंस आणि ड्रीम्स होम्स एनजीओसोबत काम करत आहे. हि संस्था बेघर मुलांना घर आणि सुरक्षा देण्याचे काम करते. समीरा आपल्या या कामामुळे अनेक बेघर मुलांची स्टार बनली आहे.

2002 मध्ये समीराने केला होता बॉलिवूड डेब्यू
समीराचा जन्म 14 डिसेंबर, 1980 ला राजमुंदरी, आंध्र प्रदेशमध्ये झाला. तिने आपल्या करियरची सुरुवात 1997 मध्ये आलेल्या एका म्युझिक अल्बम 'और आहिस्ता' ने केली होती. समीराने आपल्या बॉलिवूड करियरची सुरुवात 2002 मध्ये आलेली फिल्म 'मैंने दिल तुझको दिया' ने केली होती. त्यांनतर तिने 'मुसाफिर', 'डरना मना है', 'प्लान', 'टैक्सी नंबर 9211', 'नक्शा' यांसह अनेक फिल्ममध्ये काम केले. तिचे करियर काही खास बानू शकले नाही. तिने साउथच्या अनेक फिल्ममध्ये काम केले आहे.

X
COMMENT